राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या फेडरेशन ऑप मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकाच्या आज पुणे येथे...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या फेडरेशन ऑप मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकाच्या आज पुणे येथे झालेल्या सभेत सन २०२१ ते २०२६ या कालावधी करिता अध्यक्षपदी श्री. सुरेश गो. वाबळे यांची तसेच उपाध्यक्षपदी प्रा. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री मिलिंद सोबले यांनी घोषीत केले.
फेडरेशन ऑप मल्टिस्टेट ही देशातील कार्यरत असणाऱ्या सर्व मल्टिस्टेटच्या विकासात्मक धोरणावर काम करणारी एकमेव संस्था असुन या फेडरेशन मार्फत मल्टिस्टेट संस्थांना येणाऱ्या अडचणी व त्यावर मार्ग काढण्यासाठी देशभरात प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन तसेच सहकार चळवळ भक्कम करण्याचे काम केले जाते. फेडरेशन ऑप मल्टिस्टेट मध्ये सध्या महाराष्ट्र व कर्नाटक मधील मल्टिस्टेट संस्थेंचा समावेश असून लवकरच सात राज्यांतील मल्टिस्टेट संस्थेंचा समावेश या फेडरेशन मध्ये होणार आहे.
आज झालेल्या सभेस श्री. जितेंद्र जैन, श्री. मगराज राठी, श्री.कडूभाऊ काळे, श्री.मारोतीराव कंठेवाड, श्री.जयसिंह पंडित, श्री.नारायण खांडेकर, श्री.रवींद्र कानडे, श्री.अशोक ओव्हळ, श्री.सुकुमार पाटील, श्री.रोहन देशमुख, श्री.दिलीपसिंह भोसले, श्री.राहुल महाडिक व सौ. धनलक्ष्मी हजारे हे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
मल्टिस्टेट फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार श्री. प्रमोद गडगे यांचे हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सि ओ . सुरेखाताई लवांडे . शिवाजी आप्पा कपाळे ,कर्मवीर मल्टी स्टेट चे चेअरमन ,सह्याद्री मल्टी स्टेट बेळगाव यांनी चेअरमन व्हा . चेअरमन यांचा सन्मान केला . श्री.रवींद्र कानडे यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत