कोपरगाव/वेबटीम:- नाटेगाव आणि परिसरातील नागरिकांना कोपरगाव कडे येण्याचा जवळचा व सोयीचा असलेल्या नाटेगाव -येसगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून...
कोपरगाव/वेबटीम:-
नाटेगाव आणि परिसरातील नागरिकांना कोपरगाव कडे येण्याचा जवळचा व सोयीचा असलेल्या नाटेगाव -येसगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार विनंती करून देखील या रस्त्याच्या दुरावस्थे कडे कोणीच लक्ष देत नाही मात्र या रस्त्याच्या दुरावस्थे कडे लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या बाबतची माहिती अशी की नाटेगाव हे विधानसभा व लोक सभा मतदार संघातील शेवटचे गाव मात्र राजकीय दृष्टया संवेदनशील असले तरी विकास कामापासून कायम वंचित राहिलेले कारण या गावाच्या साधारण तीन बाजूने येवला तालुक्याची (नाशिक) हद्द असून अनेक रस्ते हद्दीच्या वादात वर्षांनुवर्षे खड्डे मय झाले ना लाभ येवला मतदार संघातून मिळतो ना कोपरगाव मतदार संघातून नाटेगाव - ब्राम्हणगाव हे दोन रस्ते कोपरगाव मतदार संघात येतात मागील दोन तीन वर्षांपूर्वी नाटेगाव ब्राह्मणगाव रस्त्याचे काम माजी आ स्नेहलता ताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून झाले असले तरी तालुक्याच्या गावाला यायला हा मार्ग तेव्हढा सोयीचा नाही
नाटेगाव -येसगाव हा परिसरातील नागरिकांनाच अत्यंत रहदारीचा रस्ता मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्ष रस्त्याची दुरावस्था झाली दहा पंधरा वर्षांपूर्वी माजी मंत्री शंकरराव जी कोल्हे साहेब यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते मात्र पंधरा वर्षांपासून या रस्त्यावर ना खडी पडली ना मुरूम ...
डांबरीकरण झालेले रस्ते किती दर्जेदार होतात आणि त्याची गुणवत्ता व टिकाऊ पणा किती असतो हे सांगायला नको मात्र पंधरा वर्षपूर्वी झालेल्या रस्त्याची अवस्था काय असेल हे वेगळे सांगायला नको ,
या रस्त्या मोठं मोठे खड्डे पडले असून चारचाकी गाडी चालवत घेऊन जाणे शक्य नाही त्याच प्रमाणे मोटार सायकल घेऊन जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते तर या भागातील शेतकरी दूध व्यावसायिक व शाळेतील विद्यार्थी यांना या रस्त्याने जाणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे ऐन वेळी एखादी व्यक्ती आजारी पडली तर ट्रॅक्टर शिवाय दवाखान्यात नेता येत नाही मात्र आजार पणात वेळेवर उपचार मिळण्या ऐवजी वेळेत औषध उपचार मिळाले नाही म्हणून जीव गमावण्याची वेळ आली आहे
नाटेगाव येथील रस्त्याच्या दुरावस्थे बाबत नागरिकांनी अनेकदा लोक प्रतिनिधींना अर्ज विनंत्या निवेदने दिली मात्र या रस्त्याच्या कामांना अश्वासना शिवाय आजून तरी काही पदरात पडले नाही
नाटेगाव येथील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वेळोवेळी लोक प्रतिनिधी ना सांगून देखील दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शेवटी नाटेगाव येथिल ग्रामस्थांनी विधान सभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रयत्नाने नाटेगाव निमगाव रस्ता मंजूर करून घेतला आहे
या रस्त्याच्या दुरास्थे कडे लोक प्रतिनिधीनी त्वरित लक्ष घालून रस्त्याचे काम सुरू करावे व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत