कोपरगाव/प्रतिनिधी:- भारतातच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पंधरा वर्षांपासून वादग्रस्त ठरलेल्या पूर्णाकृती पुत...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
भारतातच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पंधरा वर्षांपासून वादग्रस्त ठरलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज कोपरगावात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढून पुतळ्याची प्रस्तावित जागेत स्थापना करण्यात आली.
आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव जाधव, ऍड. नितीन पोळ, विनोद राक्षे, शरद त्रिभुवन आदिंनी भंडाऱ्याची जोरदार उधळण व फटाक्याची आतषबाजी करत पुतळ्याचे स्वागत केले. यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत नुकतीच तहसीलदार विजय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होऊन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या एकमताने २६ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता पुतळा आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यास आज मूर्त रूप मिळाले असून साईबाबा कॉर्नर येथे या पुतळ्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगरसेवक मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, संदीप पगारे, भाजप गटनेते रवींद्र पाठक, वैभव गिरमे, वर्षा शिंगाडे, फकीर कुरेशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, उपाध्यक्ष अशोक आव्हाटे, लोकशाहीर पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव थोरात, बाळासाहेब सोळसे, संजय सोळसे, ऍड. नितीन पोळ, शरद त्रिभुवन, विनोद राक्षे, सुखदेव जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके, राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष नवाज कुरेशी, अल्ताफ कुरेशी, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, भरत दाते आदिंच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे,हिंदु सम्राट संघटना संस्थापक बापु काकडे,मनसे युवा नेते नवनाथ मोहिते,विद्यार्थी उपशहर अध्यक्ष संजय जाधव,अजिंक्य काकडे, अनिल सुपेकर, सुमित कोळी, अभी पवार किरण आवारे, सतिश कोळी,मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे,हिंदु सम्राट संघटना संस्थापक बापु काकडे,मनसे युवा नेते नवनाथ मोहित,विद्यार्थी उपशहर अध्यक्ष संजय जाधव,अजिंक्य काकडे, अनिल सुपेकर, सुमित कोळी, अभी पवार किरण आवारे, सतिश कोळी, गौरव काळे आदि मनसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, सव्वा तासांच्या मिरवणुकीनंतर दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने हा पुतळा प्रस्तावित जागेत स्थानापन्न करण्यात आला आहे. यावेळी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांना लाडू वाटप करून आनंद व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत