देशात खरवंडी जिल्हा परिषद गट आयडाॅल करायचा- सभापती गडाख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देशात खरवंडी जिल्हा परिषद गट आयडाॅल करायचा- सभापती गडाख

पानेगांव (वार्ताहर)- हिवरे बाजार,राळेगणसिद्धी गावांसारखं काम खरवंडी गटात सुरु असून या पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देशात खरवंडी गट हा आयडाॅ...

पानेगांव (वार्ताहर)-

हिवरे बाजार,राळेगणसिद्धी गावांसारखं काम खरवंडी गटात सुरु असून या पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देशात खरवंडी गट हा आयडाॅल करायचा असल्याचे अहमदनगर जिल्हा परिषद अर्थ पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी पानेगाव (ता. नेवासे) येथे जवळपास दिड कोटींचा विविध कामांचा शुभारंभ, तसेच लोकार्पण प्रसंगी महादेव देवस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

अध्यक्षस्थानी श्रीरामपूर शिवसेना विधानसभा अध्यक्ष सुभाष जंगले हे होते.

गडाख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसून,कुणीच विकासापासून वंचित राहणार नाही.नामदार शंकरराव गडाख यांनी खरवंडी गटात विकास करण्याकरिता मला पाठविले असून त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी बारा- बारा तास काम करत आहे. विरोधक राजकारणावर बोलतं नसून व्यक्तिगत पातळीवर घाणेरडं राजकारण करताना दिसत असून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवविण्यासाठी आता पासूनच कामाला लागा तालुक्यात पुर्वी सात जिल्हा परिषद गट होते आता एक गट वाढणार असून सर्व गटांवर भगवा फडकणार असून त्यासाठी प्रत्येकाची साथ मोलाची असणार नामदार शंकरराव गडाख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात, राज्यात जोरदारपणे काम करत आहेत. जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सांगितले स्वप्न मोठे बघावे म्हणून  प्रत्येक गावात कशा पद्धतीने विकास करण्याकरिता रस्ते, पाणी,आरोग्य,शेती, पशुसंवर्धन या मध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित करुन शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल. या वर भर असून दुर्लक्षित पशुसंवर्धन विभागामध्ये आमुलाग्र बदल घडवून प्रत्यक्षात योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं उत्तम उदाहरण देवून सांगितले की,  बाजारात ज्या वेळी शेतकरी गाई खरेदी करण्यासाठी शेतकरी जातो फसवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यात मुख्य बाजाराच्या ठिकाणी घोडेगाव,लोणी,काष्टी,नगर येथे तीन कोटी रुपयांचे सोनोग्राफी मशिन घेणार असल्याचे सांगितले. तसेच गाई प्रजनन इन कॅमेरा गण तसेच सिमेन्स बाबत हि या वेळी शेतकरी उपयोगी योजना बाबत माहिती देवून गटांमध्ये खडिकरणाच्या ठिकाणी क्राॅंक्रिटीकरण रस्ते तसेच जेथे काहीच नाही तेथे तातडीने खडिकरण रस्ते थेट वाड्या वस्त्या पासून घरांच्या पायरी पर्यंत रस्ते गडाख यांनी सांगताच सर्वांनीच टाळ्यांचा गजरात स्वागत केले.

मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी गडाख कुटुंबांवर व्यक्तिगत पातळीवर आरोप करणारे पत्रके वाटले असून असा प्रवृत्तीचा जाहिर निषेधाचा ठराव खरवंडी गटाच्या वतीने करुन निषेधाचा घोषणा यावेळी देण्यात आल्या. असा पद्धतीने कुणी गलिच्छ राजकारण करणार असेल तर हि प्रवृत्ती आम्ही वेळीच आरे ला कारे उत्तर देवून त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नसल्याचं युवा सेनेचे किशोर जंगले यांनी सांगितले.

तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप यांनी सांगितले की,कधी जिल्हा परिषद माध्यमातून दहा हजार रुपयांचा निधी माहिती नव्हता परंतु आज कोट्यवधी रुपयांचा निधी गटात आणून विकास कामांचा धडाकेबाज कामगिरी सुनिल भाऊंनी केल्याने समाधान व्यक्त केले.

सभापती गडाख यांनी जवळपास बारा ठिकाणी प्रत्यक्षात जावून लोकार्पण तसेच नवीन शुभारंभ कार्यक्रमासाठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी दुचाकीवरून जावून शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, उपसरपंच रामराजे जंगले,जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, मुळा बॅंकेचे अध्यक्ष सिताराम झिने, सुभाष राख, राजेंद्र टेमक,

कार्यक्रमासाठी पानेगांव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, सुरेश जंगले,उपाध्यक्ष अशोक गागरे, राजेंद्र जंगले,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, निलेश पाटील, बापूसाहेब शेटे,जनार्दन गागरे, दिपक जंगले, बापूराव जंगले, ग्रामविकास अधिकारी संभाजी दौंडे, अंमळनेर सरपंच अच्युत घावटे,खेडलेपरमानंद सरपंच मेजर राजळे,कर्णासाहेब औटी, अण्णासाहेब कंक, भिकाजी जगताप,निंभारी पोलीस पाटील संतोष पवार, आबासाहेब फाटके, दिगंबर जाधव, डॉ रमेश जाधव, भाऊसाहेब भाग्यवंत, दादासाहेब होन, प्रकाश उंदरे, घुले मामा,सवई साहेब, सुर्यकांत टेमक आबासाहेब सोनवणे चंद्रकांत माकोणे सुभाष गुडधे, पोपटराव संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र जंगले, ज्ञानेश्वर जंगले, रमेश गुडधे, सोपानराव जंगले डॉ काकडे, सोपान चिंधे, बाळासाहेब जंगले, बाळासाहेब घोलप, निवृत्ती जंगले, सुनिल चिंधे, बाबासाहेब शेंडगे, तानाजी गायकवाड, रमेश जंगले,विशाल जंगले ,सतिश वाघमारे,आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन संदिप जंगले, प्रस्ताविक- श्रीकांत जंगले आभार- किशोर जंगले यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत