आरपीआय आंबेडकर पक्षाच्या राहुरी शहराध्यक्षपदी प्रतीक रुपटक्के यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआय आंबेडकर पक्षाच्या राहुरी शहराध्यक्षपदी प्रतीक रुपटक्के यांची निवड

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या राहुरी शहराध्यक्षपदी प्रतीक रूपटक्के यांची निवड करण्यात आली. आरपीआय आं...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या राहुरी शहराध्यक्षपदी प्रतीक रूपटक्के यांची निवड करण्यात आली.


आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या खंबीर नेतृत्वखाली व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम जिल्ह्यात मोठ्या जोमाने सुरू असून गाव तेथे शाखा व कार्यकर्ता जोडण्याचे काम जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.


 गुरुवारी राहुरी शहराध्यक्षपदी प्रतीक रूपटक्के यांची निवड करण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे,उत्तर सचिव महेश सुरोडकर , जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे, महिला जिल्हा अध्यक्ष जयाताई डोळस, तालुका अध्यक्ष प्रदीप मकासरे, युवक तालुका अध्यक्ष प्रतीक खरात आदि उपस्थित होते.


यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे म्हणाले की, आरपीआय आंबेडकर पक्ष येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक पुर्णताकदीने स्वतंत्र पॅनेल करून लढविणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन पगारे यांनी केले.


जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे म्हणाले की, आरपीआय आंबेडकर पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून प्रतिक रूपटक्के यांच्या रूपाने एक चांगला शहराध्यक्ष मिळाला आहे. फुले- शाहू-आंबेडकर चळवळीचे काम यापुढे त्याने असेच पुढे नेऊन शहरातील गोरगरिबांच्या न्याय-हक्कासाठी लढा द्यावा असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत