सात्रळ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा एड्स जनजागृती उपक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा एड्स जनजागृती उपक्रम

सात्रळ/वेबटीम:  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ येथील कला, वाणिज्य व ...

सात्रळ/वेबटीम: 



लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सात्रळ गावातून एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रासेयोच्या स्वयंसेवकांनी एड्स विषयक घोषणा देवून आणि  जनजागृतीपर फलक आपल्या हातात घेऊन सात्रळ गावातील लोकांमध्ये एड्स आजाराविषयी जनजागृती आणि प्रबोधन केले. याबद्दल सात्रळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले.

        एड्स प्रबोधन रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दिपक घोलप, सात्रळ गावचे सरपंच श्री. सतीश ताठे, प्राथमिक उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. परवीण तांबोळी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहित भडकवाड, डॉ. निलेश कान्हे, प्रा. वैभव दिघे, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नितीनकुमार पाटील, प्रा. दिनकर घाणे, डॉ. गोरक्ष बोर्डे, प्रा.लतिका पंडुरे व  सात्रळमधील ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले.

             यावेळी लोणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुपदेशक श्री. संतोष उबाळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, एड्स रोगाचे नियंत्रण हे तरुण पिढीवर अवलंबून असून तरुणांनी स्वतःचा एड्स पासून बचाव केला तरच राष्ट्राचा बचाव होऊ शकतो. एड्स आजार हा तारुण्याच्या उंबरठ्यावर झालेल्या चुकांमुळे होत असून यामध्ये  तरुणांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. 

      महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब नवले यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत अशाच प्रकारचे उपक्रम समाजासाठी राबवावेत व समाजाभिमुख कार्य करावे असा संदेश दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत