राहुरी : वेबटीम माकडाच्या हातात बंदूक पडली, की काय होत, याचा अंदाज आपण लावू शकतो, पण जर अशाच प्रकारे मूर्खाच्या हातात लेखणी पडली तर.., ...
राहुरी : वेबटीम
माकडाच्या हातात बंदूक पडली, की काय होत, याचा अंदाज आपण लावू शकतो, पण जर अशाच प्रकारे मूर्खाच्या हातात लेखणी पडली तर.., सर्वसामान्यांना किती त्रास होतो, याचे जिवंत उदाहरण अनेकांनी ' चपराशी' प्रकरणात अनुभवले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील या चपराशीने परिसरातील 'एक नाजूक' प्रकरण दाबण्यासाठी ' संपादकांचे मिटवावे लागेल' त्यासाठी चक्क एक लाखांची मागणी केल्याची चर्चा आहे. मात्र, गावकऱ्यांनी 'त्या' गरीब व्यक्तीला धीर देत त्यामागे खम्बीर उभे राहुन चपराशीला एक रुपड्या देऊ नको, आपल्या गावातील प्रश्न आपण मिटवू, 'याने' यात लुडबुड करू नये, असे चपराशीला सुनावत त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवले.दरम्यान, या प्रकरणात एका डॉक्टरने त्या मित्राला मदत केली म्हणूनच आपला एक लाखाचा मलिदा हुकला म्हणून तो लेखणीतून डॉक्टरवर रुसल्याची चर्चा आहे.
लेखणीचा उपयोग हा जनतेच्या भल्यासाठी व्हावा, त्यातून गावचे, आपल्या परिसराचे हित साधावे, अशी अपेक्षा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची होती. अनेकांनी लेखणीचे हे शस्त्र चांगल्या कामासाठी वापरले, मात्र काही भागात नको, ते झाले माकडाच्या हातात बंदूक पडावी, तशी चपराशीकडे लेखणी पडली, अन त्याने यातून वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठी त्याचा गैरवापर सुरू केला. यातून, अनेक लोकांना त्रास सुरू झाला.उंबरे, वांबोरी आणि ब्राम्हणी शिवारात तर चपराशीला अनेक जण वैतागले आहेत. ताजे उदाहरण म्हणजे काही महिन्यांपूर्वी एका गावात नाजूक प्रकरण घडले, त्याची याने लगेच मीठ मिरची लावून स्टोरी रंगवली, अतिशोक्तीपण आणि पब्लिसिटी कुठं करावी, याचंही याला भान राहील नाही. फकत कुठं तरी नडला होता, किंवा आपल्या पार्टीचा नाही, म्हणून त्याने हे प्रकरण रंगवले. यातून, पुढे त्या दोन्ही कुटुंबाना त्रास झाला. मात्र गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवले, मात्र तरीही यावर, तो थांबला नाही, त्याने 'त्या' व्यक्तीला फोन करून काय झालं पुढं मग, मला संपादकांचा फोन आला होता, त्यांनी विचारायचं सांगितलं, अशी विचारणा केली, त्यावर ' त्या' व्यक्तीने ' भाऊ' प्रकरण मिटले राव, तुम्ही गरिबाला उगाच त्रास देऊ नका, अशी काकुळतीला येऊन विंनती केली, मात्र, त्याने यावर कळस करत संपादकांच काहीतरी पहावं लागेल, एक लाखभर रुपये तरी द्यावी लागतील, नाहीतर प्रकरण वाढेल, असा दम भरला. त्यामुळे तो गरीब व्यक्ती आणखी घाबरला, त्याने पुन्हा इकडे तिकडे धाव घेतली, यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला धीर देत, एक रुपया देऊ नको, आपल्या गावातील प्रकरण आपण मिटवू, याने यात नाक खुपसू नये, असा सज्जड दम भरला, त्यामुळे त्या व्यक्तीला आधार मिळाला, मात्र तरीही हा अधून मधून फोन करत होताच, अखेर चपरराशाच्या नंबर ब्लॉक लिस्टला टाकून त्याने संपर्क बंद केला. आशा प्रकारे दररोज एक एक नवीन कारनामे लोक' आवाज जनतेचा' पर्यंत पोहचवून, गेली 25 वर्ष लोकांची वेळोवेळी व्यक्तिगत खुन्नस काढून लेखणीद्वारे बदनामी करणाऱ्या 'वरतडे' या काटेरी वनस्पतीला स्वतःची बदनामी झाल्यावर काय घडत, याची अनुभूती यावी, यासाठी तचपराशी प्रकरण, त्याचे काळे उद्योग जनतेसमोर मांडाच, असा सूर लोकांचा आहे. ब्राम्हणी आणि वांबोरीतुनही अनेक लोकांनी आवाज जनतेचे या बद्दल अभिनंदन करत आणखी काही मजेदार किस्से जनतेचया हितासाठी प्रसिद्ध करण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे आम्हीही जनतेच्या मागणीसाठी हे प्रकरण याची खोड मोडेपर्यंत लावून धरले आहे, कदाचित आमच्यावरही आरोप होतील,मात्र यासाठी आम्ही आगोदरच मानसिक तयारी आणि तशी सहनशक्ती बनवून ठेवली आहे, हे नक्की। चपराशीचे काल वांबोरी शिवारातील 'ते' प्रकरण 'आवाज जनतेचा' मधून बाहेर आल्यानंतर उंबरे गावातील तरुणांनी ते गावासह तालुकाभर सोशल मीडियावर फिरवले, चार तासात ते 6700 लोकांपर्यंत पोहचले, मात्र, चपराशीने मोठा थयथयाट करत, ज्या ज्या मुलांनी चपराशीचा कारनामा व्हाट्सअप ग्रुपला फिरवला, त्यांचे घर गाठले, आपण पाहुणे आहोत, असे माझ्याबरोबर वागू नका,माझी बदनामी करू नका, अशी विनंती केली, मात्र, ज्यावेळी या कुटुंबाला आधाराची गरज होती त्याच वेळी या पाहुण्याने त्यांना लेखणीद्वारे खूप त्रास दिला, अक्षरश जामीनही होऊन दिला नाही, वयक्तिक खुन्नस काढण्यासठी त्याने एसपीपर्यंत धाव घेतली होती, याची त्या कुटुंबाने आठवण करून देताच, आता तुला आम्ही पाहुणे आहोत, हे कळलं का ? असा सवाल करत त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याची गावभर चर्चा सुरू आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत