राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडी कडून चौकशी! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडी कडून चौकशी!

राहूरी(वेबटीम):- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून  सात तासां पासून चौकशी केली. तनपुरे यांनी कमी किंमतीत साखर कारखाना खेरेदी क...

राहूरी(वेबटीम):-


ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून  सात तासां पासून चौकशी केली. तनपुरे यांनी कमी किंमतीत साखर कारखाना खेरेदी केला होता त्या संदर्भात चौकशी केली असल्याचे समजते.

         विदर्भातील एक साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून बेस किमती पेक्षा कमी किंमतीत खरेदी करून तो  अहमदनगर जिल्ह्यात स्थापित केला, हा व्यवहार कसा झाला, या साठी कसे पैसे उभे केले गेले याबाबत ईडीला असलेल्या संशयावरून ही चौकशी झाल्याचे वृत्त आहे.


            सदर कारखाना हा वर्ध्यातील होता अशी माहिती असून तो बेस किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करून नगर जिल्ह्यात वांबोरी इथे प्रसाद शुगर मिल या नावाने चार-पाच वर्षांपासून सुरू असून त्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली आहे.

            महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्ज दिली होती. त्यात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने विदर्भातील येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज प्रकरणात जप्त केला होता. या कारखान्याचा नंतर 2012 सालात लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी होती मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनी ने 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता. या सर्व व्यवहारावर ईडीला संशय आहे.  या अनूशंगाने ईडी चौकशी केली. आज प्राजक्त तनपुरे यांना समन्स देऊन बोलावण्यात आपलं होतं. त्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले. 7 तासापेक्षा जास्त वेळ  ना. तनपुरे यांची ईडी चौकशी करत होते.


रात्री 11 वाजता ते बाहेर आले.मी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना ना.तनपुरे यांनी दिली.


दरम्यान ना.तनपुरे यांच्या इडीच्या चौकशीचे वृत्त राहुरीत धडकताच 'वि सपोर्ट दादा' अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना पहावयास मिळाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत