राहुरी/वेबटीम:- मुस्लीम धर्मगुरू म्हणून समाजात कार्य करत असतानाच कायद्याचा सखोल अभ्यास केलेले व समाजात एलएलबी ही मानद पदवी प्राप्त करणारे ...
राहुरी/वेबटीम:-
मुस्लीम धर्मगुरू म्हणून समाजात कार्य करत असतानाच कायद्याचा सखोल अभ्यास केलेले व समाजात एलएलबी ही मानद पदवी प्राप्त करणारे राहुरी येथील धर्मगुरू अॅड. मुजाहिद खान यांनी यश संपादित केल्याबद्दल समाजाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
राहुरी येथे मुस्लीम समाजातील पवित्र कुरआण तोंडपाठ करून हाफीजे कुरआण झालेले मौलाना मुजाहिद मुअज्जम खान यांनी वडिलांची प्रेरणा घेत समाजामध्ये चांगल्या कामांना पाठबळ दिले. वंचित, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याच्या ज्ञानाची गरज असते हे लक्षात घेऊन मुजाहिद खान यांनी हाफीज कुरआन या पदवीसह एलएलबीच्या अभ्यासक्रमातही दैदिप्यमान यश संपादित केले. त्यांना वकील पदाची मानद पदवी व सनद प्राप्त झाली. त्याबद्दल मुस्लीम समाजाच्या वतीने मौलाना खान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राहुरी तालुक्यातील इम्रानभाई देशमुख, बिलालभाई शेख, डॉ. जाकीर शेख, इमदाद पठाण, सोहल खान, मुज्जूभाई पठाण, मुजम्मील शेख, नोमान वस्ताद, इम्रान सय्यद, संजय संसारे आदींनी जिल्ह्यातील पहिले हाफीज हे अॅडव्होकेट झाल्याबद्दल सन्मान सोहळा आयोजित केला होता. उपस्थितांनी मौलाना अॅड. खान यांना शुभेच्छा देत आगामी काळामध्ये जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालचामध्ये गरजूवंतांना न्याय देण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करण्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत