राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधाममधील शववाहिनीचे लोखंड चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधाममधील शववाहिनीचे लोखंड चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
तनपुरे कारखान्याच्या जागेत असलेल्या अमरधामची दयनीय अवस्था झाल्याने. देवळाली प्रवरा नगरपालिकेने या अमरधामचा कायापालट केला.
यामध्ये नगरपालिकेने याठिकाणी रस्ता दुरुस्ती, पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था, विजेचा प्रश्न , तार कंपाउंड, वृक्ष लागवड असे विविध कामे नुकतेच पूर्ण करून ते उपलब्ध करून दिले होते
दरम्यान अमरधाममधील शववाहिनीचे लोखंड चोरी केल्याची घटना घडल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून ज्या ठिकाणी माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो त्याच ठिकाणच्या शववाहिनीचे लोखंड चोरणाऱ्या विकृत प्रवृत्तीला चांगलेच धडे शिकवले पाहिजे असे संतप्त नागरिकांतून बोलले जात आहे.
चोरी करणारा दाखवून दिल्यास एक हजार रुपयांचे बक्षीस - किरण चव्हाण
अमरधाम मधील शववाहिनीच्या लोखंडाची चोरी करणाऱ्या चोरास सापडून दिल्यास त्यास १००० रुपयांचे बक्षीस सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
*व्हिडीओ*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत