पानेगाव(बाळासाहेब नवगिरे) सोशलमिडीया, आँनलाईन जमान्यात राजकारणात ढोंगीपणा करणाऱ्यांचे दिवस गेले-असल्याचे युवा सेनेचे व मुळा एज्युकेशन संस्थ...
पानेगाव(बाळासाहेब नवगिरे)
सोशलमिडीया, आँनलाईन जमान्यात राजकारणात ढोंगीपणा करणाऱ्यांचे दिवस गेले-असल्याचे युवा सेनेचे व मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख पाटील ईन डोअर,व खुल्या व्यायाम शाळेच्या उद्घाटनप्रसंगी पानेगाव (ता.नेवासे) महादेव देवस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी- ग्रामपंचायत सदस्य आबांदास गुडधे हे होते.
आपल्या भाषणात युवा नेते गडाख यांनी सांगितले की, राजकारणात ढोंगीपणा करणाऱ्यांपासून सावध रहा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नांव न घेता ढोंगीपणाच्या अनेक विषयावर हात घातला.
राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांचा मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा परिषदेचे सभापती सुनिल गडाख यांनी जवळपास पानेगाव येथे दिड कोटींचा निधी दिला असून रस्ते, पाणी, महादेव देवस्थान अंतर्गत कामे, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शुशोभिकरण अंगणवाड्या बरोबरच आणखी दिड कोटींचा निधीही देण्याची ग्वाही गडाख यांनी देवून निधी घ्या काम करा व्यक्तिगत कामापेक्षा गावच्या विकासाला प्राधान्य द्या स्थानिक गट -तट बाजूला ठेवून नामदार शंकरराव गडाखांचा पाठीमागे ठाम उभे रहा मी स्वतः तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. निवडणूका येतात जातात मैत्रीचे नाते घट्ट करा, कधी पण हक्काने फोन करा परंतु लबाड ढोंगीपणा करणाऱ्यांपासून सावध रहा यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी युवा नेते गडाख यांचा मुळाथडी परीसरातील पानेगाव येथे उद्घाटनाचा पहिल्यांदाच योग आला.
गडाख यांनी अभ्यासपूर्ण भाषणात तालुका जिल्हा बरोबरच राज्यातील विविध विषयांवर लेखा -जोखा मांडून भविष्यात जिल्ह्याला परिपूर्ण राजकारणातील आपण हि काही कमी नसल्याचे या निमित्ताने दाखवून देवून उपस्थित मंडळींनीही टाळ्या वाजवत दाद देत होते . नागरिक हि म्हणत होते भविष्यातील समाजसेवी राजकारणातील उदयन गडाख हिरा असल्याचं बोलून दाखवलं.
यावेळी लोकनियुक्त सरपंच संजय जंगले यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती देवून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नामदार शंकरराव गडाख यांचा मागे ठाम उभे राहून मत पेटीतून जिल्हा परिषद सभापती सुनिल गडाख यांना भरघोस मतदान होणार असल्याचं सांगितलं.
पानेगाव येथील अमेरिका येथे जाॅब करत असलेले दिपक जंगले,आयलस लाॅ काॅलेज विधिज्ञ शिक्षण पुर्ण झालेले संकेत जंगले, शासकीय काॅलेज पुणे बी टेक डिग्री पुर्ण करुन हैदराबाद येथे एन सी आर कंपनी उच्च पदावर काम करत असलेले संकेत जंगले यांचा सन्मान यावेळी उदयन गडाख यांचा हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले,पानेगाव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, उपाध्यक्ष अशोक गागरे, माजी सरपंच हौशाबापू जंगले सुरेश जंगले, राजेंद्र जंगले, साहेबराव जंगले,जालिंदर जंगले, रमेश जंगले, शिवाजी जंगले,सोपानराव जंगले,उपसरपंच रामराजे जंगले,कै पोपटराव संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र जंगले, रमेश गुडधे, सुभाष गुडधे,भारत जंगले, जनार्दन गागरे,सुरज जंगले, विशाल जंगले, दिनेश जंगले, संकेत जंगले,दिपक जंगले, सुनिल चिंधे, बाबासाहेब शेंडगे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब दौंड सतिश वाघमारे, संजय पवार,कडूबाळ काकडे,आदी सह मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग उपस्थित होता.प्रस्ताविक- बाळासाहेब नवगिरे , सुत्रसंचालन- संदिप जंगले यांनी तर आभार- किशोर जंगले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत