कोपरगाव / प्रतिनिधी कोपरगाव नगरपरिषदेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात गुरुवारी (ता.६) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी दर्पण व...
कोपरगाव / प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात गुरुवारी (ता.६) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी दर्पण वृत्तपत्राची सुरुवात केल्याबद्दल पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे होते. मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. तर राम थोरे यांनी कोपरगावातील पत्रकारांच्या योगदानाचा उल्लेख केला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी तालुक्यातील धोंडेवाडी येथे हरवलेले ९३ अतिक्रमण हटवले याची माहिती दिली, याची पत्रकारांनी सर्व बाजूंनी त्याचे वृत्तांकन कसे दाखवले याचे कौतुक करत सर्व बाजू दाखविण्याचे काम निपक्ष पत्रकार करत असल्याचे एका वृत्तवाहिनीने उदाहरण देऊन सांगितल्याचे अधोरेखित केले. याचबरोबर वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांमधील फरक दाखवून दिला. या कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष राम थोरे, कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन महारुद्र गालट यांनी करून आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत