राजर्षी शाहू महाविद्यालयात ‘जागतिक हिंदी दिवस’ साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजर्षी शाहू महाविद्यालयात ‘जागतिक हिंदी दिवस’ साजरा

देवळाली  प्रवरा(वेबटीम):;  राजर्षी शाहू महाविद्यालय,देवळाली प्रवरा हिंदी विभागाच्या वतीने दि.१० जानेवारी,२०२२ रोजी ‘जागतिक हिंदी दिवस’ साजरा...

देवळाली  प्रवरा(वेबटीम):;



 राजर्षी शाहू महाविद्यालय,देवळाली प्रवरा हिंदी विभागाच्या वतीने दि.१० जानेवारी,२०२२ रोजी ‘जागतिक हिंदी दिवस’ साजरा करण्यात आला. या विश्व हिंदी  समारोहसाठी  अध्यक्ष म्हणून प्रा. राजू साळवे हे होते.


यावेळी त्यांनी आपल्या व्याख्यानातून हिंदी केवल संपर्क भाषा नसून ती  रोजगारभिमुख व आंतरराष्ट्रीय भाषा बनली आहे.हिंदी या भाषेचा सन्मान केला पाहिजे असे ते म्हणाले.त्यांनी आपल्या कवितेतून हिंदी भाषेचा गौरव केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना हिंदी विभाग प्रमुख  प्रा.बाळासाहेब फुलमाळी यांनी केले व आभार प्रा. रागिणी टेकाळे यांनी मानले.


कु.सुस्मिता घटकांबळे या विद्यार्थिनीने हिंदी विषयाबद्दल  आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी प्रा.महेश निंबाळकर,डॉ.बापू खिलारी,प्रा.संतोष गुंड,प्रा.प्रकाश रोकडे.प्रा.शेख,प्रा.निबे,प्रा.भाकरे,आदि.प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी मा.प्राचार्या यांचे मागर्दर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत