कोपरगाव/वेबटीम:- युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण युवा सेना सरचिटणीस अमोल भैया किर्तीकर युवासे...
कोपरगाव/वेबटीम:-
युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण युवा सेना सरचिटणीस अमोल भैया किर्तीकर युवासेना सचिव वरुनजी सरदेसाई सहसचिव विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील भैया तिवारी ,शिवसेना उत्तर अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,गिताताई झगडे शिर्डी लोकसभा विस्तारक युवती सेना,कलविदरसिंग दडियाल शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील युवती सेनेचे कामकाज मोठ्या उत्साहाने चालू आहे.कोपरगाव शहरातील शिवसेनेच्या युवती सेनेच्या वतिने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी २०२१ रोजी माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन करुन या कार्यक्रमाला सुरुवात झाली.या वेळी महिला शिक्षिकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.जयश्री जाधव,भावना खैरणार,स्नेहल वाकचौरे,अर्चना बोराडे,अलका भोसले,गयाबाई इंगळे आदि शिक्षिका महिलेचा सन्मान करुन सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.महिलांना गुलामगिरीतुन काढण्यासाठी क्रांती ज्योती सावित्रिबाई फुले यांनी अंथाग परिश्रम घेवुन क्रांतीचा लढा उभारून महिलांना शिकवले. आज जी महिलांची जी प्रगती झाली आहे.ती केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच, महिलांनी शिक्षित होणे गरजेचे आहे.आज अनेक महिला शिक्षिका झाल्या असुन त्या महिलांनाही शिकवत आहे.याच महिला खर्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंच काम पुढे नेत आहे असे प्रतिपादन युवती सेनेच्या शिर्डी लोकसभा विस्तारक गीताताई झगडे यांनी केले आहे.या कार्यक्रमासाठी शिवसेना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल,सुनिल भैैय्या तिवारी,एम.के.आढाव विद्यालय शिक्षण समितचे बाळासाहेब सांळुके युवती सेनेच्या शितल चव्हाण ता अधिकारी, आरती कौर,पुजा शर्मा,सुकन्या आमले,शिवानी पासवन,गौरी सांळुके,प्रीती कोपरे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत