सत्याची कास धरून जिवनाचे सोने करण्याचे स्वर्गीय पी. बी.कडू पाटीलांची आदर्श शिकवण =आ. लहू कानडे. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सत्याची कास धरून जिवनाचे सोने करण्याचे स्वर्गीय पी. बी.कडू पाटीलांची आदर्श शिकवण =आ. लहू कानडे.

सात्रळ/वेबटीम:- सत्याची कास धरून जिवनाचे सोने करण्याचे आदर्श  थोर स्वातंत्र्य  सेनानी कॉ. पी. बी. कडू पाटील यांनी सामाज्यापुढे ठेवला असून  आ...

सात्रळ/वेबटीम:-



सत्याची कास धरून जिवनाचे सोने करण्याचे आदर्श  थोर स्वातंत्र्य  सेनानी कॉ. पी. बी. कडू पाटील यांनी सामाज्यापुढे ठेवला असून  आप्पांचे  विचार  तरुण पिढीपर्यंत जाण्याची  काळाची गरज आहे असे मत आ. लहू कानडे  यांनी मांडले आहे. 


सात्रळ येथील ना. स. कडू विद्यालयात संपन्न  झालेल्या थोर स्वातंत्र्य  सेनानी मा. आ. कॉ. पी. बी. कडू पाटील तथा  आप्पा  यांच्या पाचव्या स्मुतीदिन व समाज दिन सोहळ्यात ते आपल  प्रमुख  भाषणात  बोलत होते. सोहळ्याच्या  प्रारंभी  कै. अप्पांच्या  तैलचित्राचे  पूजन प्रमुख  पाहूणांच्या  हस्ते झाले. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी  संभाजीराव  चोरमुंगे  होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात  "रयत " चे उपाध्यक्ष  अरुण कडू पाटीलांनी " रयत "चे माजी अध्यक्ष  कै. ऐन. डी. पाटील व  कै. सिंधुताई  सपकाळांना  श्रद्धांजली  वाहून  त्यांच्या कार्याचा  गौरव केला. कै. एन. डी. पाटीलांनी "रयत "मधील  कार्य, योगदान, संस्थेसाठी  घेतलेले फायदेशीर निर्णय, सामाजिक  कार्य  तसेच  कै. सिंधुताई  सपकाळ  यांनी यांचे सामाजिक कार्य, त्यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध  याचा विस्तृत  उल्लेख केला. 


आपल्या  प्रमुख भाषणातून आ. लहू कानडे  यांनी  थोर स्वातंत्र्य  सेनानी  कॉ. कडू पाटलांचे विचार, साम्य वादासाठी त्यांनी केलेला संघर्ष, विचारांना तिलांजली न  देता आपल्या  तत्वासाठी  केलेली लढाई, शेतकऱ्याच्या मुलांच्या  शिक्षणासाठी ची तळमळ, त्यातील कार्य, स्वातंत्र्य  चळवळीतील  त्यांचे योगदान  व  सहभाग, तसेच त्यांच्या  बरोबर काम करताना आलेले अनुभव अश्या  विविध  पैलूंचा  उल्लेख  करत  त्यांच्या विचारांचा आदर्श तरुणांपर्यंत  पोहचविणाचे आवाहन  केले. 



या प्रसंगी  विजयराव  कडू, प्रा. गहिनाथ  विखे, डॉ. के. के. बोरा, ऍड. बाळकृष्ण  चोरमुंगे, बबनराव कडू, दिलीपराव  डुक्रे, भास्करराव  फणसे, वसंतराव  ब्राह्मणे, अनिलशेट  लोढा, विलास मुंदडा, किशोरशेट  भांड, दादासाहेब  पवार, किरण कडू, पंकज कडू, विक्रांत  कडू, गणेश  कडू, नंदूभाऊ  कडू, सागर डुक्रे,प्राचार्य  वानखेडे, निभे मॅडम, सी. एन. गोर्डे, जी. टी. गमे,   "रयत " सेवक वर्ग, तसेच  ग्रामस्थ  व  महिला  मोठया  संख्येने  उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  एम. जी. कडलग व  सिराज मन्सुरी  यांनी  उत्तमरीत्या केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत