कोपरगाव(वेबटीम) संपूर्ण आयुष्यभर योगसेवा करणारे कोपरगाव शहरातील ज्येष्ठ योगाचार्य उत्तम शहा व त्यांचे चिरंजीव योग प्रशिक्षक अभिजीत शहा यांचा...
कोपरगाव(वेबटीम)
याचबरोबर गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे (सामाजिक अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त) व त्यांचे चिरंजीव प्रज्ज्वल (नॅशनल योगा स्पर्धेत सिल्व्हर मेडल व खेलो इंडियाला निवड), वैष्णवी (योगा नॅशनल) यांचाही निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला.
तसेच ज्येष्ठ योगा शिक्षिका वृन्दा कोर्हाळकर यांनाही सेवाव्रती सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात विशेष कार्य करणार्या, नैपुण्य प्राप्त करणार्या व्यक्तींना सन्मानित करण्याचा छोटासा उपक्रम स्वर्गीय माजी खासदार सूर्यभान वहाडणे प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे. यानंतरही हा उपक्रम असाच सुरू रहाणार असल्याचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत