कोपरगाव(वेबटीम):- शनिवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी लायन्स क्लब कोपरगाव व लिओ क्लब कोपरगाव आयोजित आणि कालांश राजगिरा लाडू व चिक्की आणि कॅफ...
कोपरगाव(वेबटीम):-
शनिवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी लायन्स क्लब कोपरगाव व लिओ क्लब कोपरगाव आयोजित आणि कालांश राजगिरा लाडू व चिक्की आणि कॅफे स्पोर्ट प्रायोजित स्कूल बॅग वाटप कार्यक्रम संपन्न झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती या ठिकाणी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
शिक्षण ही काळाची गरज असून शिक्षण घेतल्याशिवाय भविष्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये यश मिळणे कठीण आहे आणि हे शिक्षण घेत असताना आवश्यक त्या सुविधांची गरज आहे हीच गरज ओळखून लायन्स क्लब कोपरगाव व लिओ क्लब कोपरगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती या ठिकाणी स्कूल बॅग चे वाटप केले ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे काहीप्रमाणात सोयीचे होईल.
सदर कार्यक्रमासाठी कालांश राजगिरा लाडू आणि चिक्की चे संचालक रोहित काले आणि कॅफे स्पोर्ट चे संचालक राजेशजी ठोळे* यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असे सांगून लायन्स क्लब कोपरगाव चे अध्यक्ष राम थोरे यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे सचिव अक्षय गिरमे खजिनदार सुमीत भट्टड प्रसाद भास्कर,प्रशांत भास्कर, सोमनाथ सोनवणे,लिओ क्लब कोपरगाव चे अध्यक्ष आदित्य गुजराथी, पृथ्वी शिंदे, धीरज कराचीवाला, कोपरगाव पीपल्स बँकेचे नवले साहेब, ग्रामपंचायत सदस्य रमेश गणपत भास्कर तसेच केंद्रप्रमुख विद्या भोईर मुख्याध्यापक सोंजे सर, विधाते सर, खैरे सर,गायकवाड सर, मोरे सर आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत