रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे ७६५ विद्यार्थ्यांचे कोव्हिड लसीकरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे ७६५ विद्यार्थ्यांचे कोव्हिड लसीकरण

  सात्रळ(वेबटीम) नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापुजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ येथे विद्यार्थ्यांचे कोव्हिड लसीकरण स...

 सात्रळ(वेबटीम)



नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापुजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ येथे विद्यार्थ्यांचे कोव्हिड लसीकरण सुरळीत पार पडले.


      कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या लाटेचा धोका होऊ नये यासाठी शासनाने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण वेगाने सुरू केले आहे.यात सात्रळ येथील १५ वर्षा पेक्षा वय असणा-या विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले. अशी माहिती डॉ.परवीन तांबोळी यांनी दिली.


      यावेळी प्राचार्य अशोक वानखेडे म्हणाले, सध्या ओमिक्रोन तिसऱ्या लाटेचा धोका वाढतो आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण देशव्यापी कार्यक्रम जाहीर केला. रयत संकुलाने सर्वप्रथम प्रतिसाद देत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लसीकरण घेतले.

    सात्रळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.परवीन तांबोळी,श्रीम.चन्ने पी.बी, आरोग्यसेवक डॉ. श्री.ब्राम्हणे.सी.बी,सौ.दिघे यु.व्ही, उज्ज्वला वैद्य, कल्पना डुक्रे यांच्या हस्ते उद्घाटन करुन ‌सर्व विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.

    याप्रसंगी युवानेते पंकज कडू पाटील, भाऊसाहेब पेटकर, सचिन पवार, पर्यवेक्षक सिताराम बिडगर आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत