सात्रळ(वेबटीम):- विखे पाटील कुटुंबियांवर विषेश प्रेम असणार्या सोनगाव साञळ धानोरे पंचक्रोशीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या...
सात्रळ(वेबटीम):-
विखे पाटील कुटुंबियांवर विषेश प्रेम असणार्या सोनगाव साञळ धानोरे पंचक्रोशीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह माजी मंञी आ राधाकृष्ण विखे पाटील व नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डाॅ सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रकृतीसाठी निझर्णेश्वर येथील महादेवाला नारळ वाहुन दुधाचा अभिषेक करून साकडे घातले.
गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना कालखंडात तन मन धनाने विखे पाटील कुटुंबियांनी जनतेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले,अन्नछञ सुरू करून लाॅकडाऊन काळात तळागाळातील प्रत्येक सर्वसामान्य जनतेची भुख भागवली,कोरोनाचे महागडे उपचारापासुन जिल्ह्यातील नागरिकांना ठिक ठिकाणी मोफत कोव्हीड सेंटर उभारून मोफत इलाज करून मोठा दिलासा दिला.
जिल्ह्यात कोव्हीडची चाचणी होत नसताना विळद येथील विखे पाटील हाॅस्पीटल मध्ये कोव्हीड ची चाचणी उपलब्ध करून देत अनेक सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळवुन नागरिकांची होणारी हेळसांड बंद झाली.राज्य सरकारच्या व प्रशासनाच्या जाचक व अन्यायकारक नियमांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या बाजुने विखे पाटील कुटुंब कायम उभे राहीले.लोकांच्या सुख दुखाःत सहभागी होऊन आधार व प्रेम देण्याचे काम या परीवाराने केले व करत आहेत स्वतःहा कोरोना पॉझिटीव्ह असुनही आ राधाकृष्ण विखे पाटील हे लहान मुलांच्या लसीकरणाबाबत हिरीरीने पुढाकार घेत आहेत.अशा या सर्वसामान्यांच्या देवमाणसाच्या कुटुंबाला या कोरोना रूपी दानवाने विळखा घातला असुन त्यांच्या सह त्यांचे सर्व कुटुंबिय लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी निझर्णेश्वरच्या महादेवाला साकडे घालण्यात आले.
यावेळी भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व सोनगाव चे उपसरपंच किरण पाटील अंञे,नगर दक्षिण सेल मिडीयाचे रवींद्र पा दिघे व भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाचिटणीस बिपीन ताठे,महेश पा दिघे,अभिजीत काका कुलकर्णी व पंचक्रोशीतील तरूण कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत