रात्रीच्या वेळी ऊर्जा मंत्रांनी सोडविल्या शेतकऱ्यांच्या अडचणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रात्रीच्या वेळी ऊर्जा मंत्रांनी सोडविल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

सात्रळ/(वेबटीम):- सात्रळ  परिसरातील एका सामान्य शेतकऱ्याने  बंद करत असलेल्या रोहित्र संबंधी   केलेल्या तक्रारीची दाखल घेत ऊर्जा राज्य मंत्री...

सात्रळ/(वेबटीम):-



सात्रळ  परिसरातील एका सामान्य शेतकऱ्याने  बंद करत असलेल्या रोहित्र संबंधी   केलेल्या तक्रारीची दाखल घेत ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त  तनपुरे थेट शेतकऱ्यांशी चर्चा  करून वीज पुरवठ्याच्या, तसेच वीज बिल न भरल्याने बंद केलेल्या रोहित्र संबंधीचा प्रश्न रात्री उशिरापर्यंत  बसून सोडविला असून बंद केलेले वीज रोहित्र चालू करण्याचे आदेश दिले  आहेत.



शेतकऱ्यांशी  झालेल्या चर्चेत  महावितरणबाबतचे प्रश्नांची  सोडवणूक करत त्यानं वीज पुरवठा  सुरळीत  ठेवण्यासाठी  तसेच महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासाठी  बिलाची रक्कम  काही प्रमाणात तरी भरण्याचे गरजेचे असल्याचे आवाहन  केले. 


या संदर्भातील  केंद्र सरकारचे मार्गदर्शक तत्वांचेही त्यांनी माहिती देऊन वीज बिल भरणे का गरजेचे आहे याचे विश्लेषण  केले. तसेच  जी बिलाची  रक्कमेचा वसुल  सबस्टेशनच्या अतंर्गत येणाऱ्या भागातून येणार त्यातील 33 टक्के  रक्कम  ही त्याच भागात वीज वितरणाच्या मूलभूत सुविधांसाठी  वापरणार असल्याचे नमूद केले.



शेतकऱ्यांनी  मांडलेल्या इतर प्रश्नांमध्ये प्रामुख्याने  फळबाग विमा न मिळाल्याबद्दलची चर्चा, पाटपाणी  प्रश्न इत्यादी  विषयावर विचार विनिमय होऊन  लवकरात लवकर सोडवणूक करणार असल्याचे आश्वासन  दिले. या प्रसंगी  भाजपा  ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाचिटणीस  बिपीन ताठे यांनी मंत्री प्राजक्त  तनपुरे यांना वीज रोहित्र  बंद करू नये या आशयाचे  निवेदन  देऊन शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा संबंधीच्या अडचणी मांडल्या. 


या प्रसंगी  मिलिंद अनाप,  सुभाष डुक्रे, दिलीप डुक्रे संजय नागरे, सूर्यकांत शिंदे, गणेश कडू, बिपीन ताठे, अतुल ताठे, अमित ताठे, सात्रळ चे सरपंच सतिष  ताठे, शिवम कडू, अविनाश  डुक्रे, नितीन ताठे, अभिजित कुलकर्णी, पंकज  डुक्रे, अमोल दिघे, सुनील अंत्रे, नरेंद्र  अनाप, दत्तात्रय  अनाप, अण्णासाहेब  अनाप महावितरणचे सहा अभियंता  बडगुजर, तसेच परिसरातील  शेतकरी  मोठया  संख्येने  उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत