सात्रळ/वेबटीम:- आशेचे द्वार प्रतिष्ठाण पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने राहुरी तालुक्यातील सात्रळ ग्रामपंचायत कार्यालयात गरजू व विधवा महिल...
सात्रळ/वेबटीम:-
आशेचे द्वार प्रतिष्ठाण पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने राहुरी तालुक्यातील सात्रळ ग्रामपंचायत कार्यालयात गरजू व विधवा महिलांना संस्थेचे अध्यक्ष जोसेफ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते सुभाष मुन्तोडे व त्यांची पत्नी सौ. मनिषा मुन्तोडे यांच्या उपस्थितीमध्ये साड्यांचे वाटप करण्यात आले. सुभाष मुन्तोडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती सांगून महिलांना मार्गदर्शन केले.
प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रमेश पन्हाळे यांनी सात्रळमध्ये मोटरीसह बोअरवेल ची मागणी केली. या कार्यक्रमास सरपंच सतिश ताठे, सदस्य भाऊसाहेब पलघडमल, साळू पलघडमल, रामा पवार, रामदास पवार व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रतिष्ठान च्या वतीने गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत