आंबी/वेबटीम:- धनगर समाज संघर्ष समितीच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी आंबी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर बाळकृष्ण रोडे यांची एकमताने फेरन...
आंबी/वेबटीम:-
धनगर समाज संघर्ष समितीच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी आंबी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर बाळकृष्ण रोडे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.
श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक व राज्यसभा खा. डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते रोडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. खासदार डॉ. विकास महात्मे, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल राऊत, जिल्हाध्यक्ष दत्ता खेमनर यांनी दाखविलेला विश्वास व मिळालेले पद यांचा उपयोग समाजहित, सामाजिक कार्यासाठी करणार असल्याचे रोडे यांनी सांगितले.
जालिंदर रोडे यांचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष चांगदेव नजन, बाबासाहेब राशिनकर, निलेश गोराणे, अशोक तागड, योगेश राऊत, बबन पिंगट आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत