कोपरगाव / प्रतिनिधी:- संत गाडगेबाबा यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने नगरपालिकांसाठी पूर्वी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानात बक्षिसे दिले जात...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
संत गाडगेबाबा यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने नगरपालिकांसाठी पूर्वी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानात बक्षिसे दिले जातात. यासाठी स्पर्धेत भाग घ्यावाच लागतो. या सर्वेक्षणात भाग घेताना एक-दोन महिने काळजीने केले जाते. त्यावर लाखो रुपयांचा खर्चही केला जातो. परंतु, त्यानंतर परिस्थिती 'जैसे थे'च होते. यामुळे पालिका या अभियानात अव्वल कधी येणार असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी विचारला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाटील यांनी म्हंटले आहे की, कोपरगाव पालिकेने स्वच्छता अभियानात सहभाग घेतलेला आहे. त्यानुसार पाहणी करण्यास येणाऱ्या पथकाला खूश करण्यासाठी ठिकठिकाणी स्वच्छता, प्रबोधनात्मक फलक, रांगोळी, दिवाबत्ती, रस्ते दुरुस्ती अशी कामे तातडीने करतात. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्चही करतात. परंतु, पथक माघारी गेल्यानंतर परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होते.
दरम्यान, दोन महिन्यापूर्वी नगरपालिकेला रंगरंगोटी केली, साफ सफाई केली, रांगोळ्या काढल्या आणि महसूल आयुक्त व जिल्हाधिकारी यांना खूश केले. पण खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबा यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मानवात देव बघावा असे नगरपालिका कधी करणार? अधिकारी आले की स्वच्छता, रंगरंगोटी केली जाते. मग इतर वेळेस जनता काय जनावरे आहे का ? केवळ बक्षीस मिळविण्यासाठी नव्हे तर कोपरगाव धूळमुक्त, कचरा मुक्त, गोदावरी नदीला प्रत्येक घरातून जाणारे सांडपाणी, मैला, कत्तल होऊन जाणारे रक्त यावर स्वेज ट्रीटमेंट प्लांट बसवून कायमचे शहर व गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे. मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत