सात्रळ/वेबटीम:- महावितरण ने परिसरातील विद्युत रोहित्रे कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केलेले असून सदर रोहित्रांचा विद्युत पुरवठा तातड...
सात्रळ/वेबटीम:-
महावितरण ने परिसरातील विद्युत रोहित्रे कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केलेले असून सदर रोहित्रांचा विद्युत पुरवठा तातडीने चालू करण्यासाठी तसेच महावितरण च्या अनागोंदी कारभारा विरोधात परिसरातील भाजप पदाधिकारी तसेच शेतकरी मोठया संख्येने सात्रळ सब स्टेशन वर जाऊन उप अभियंता टेकाळे यांना निवेदन दिले. निवेदनात महावितरण ने तातडीने वीज जोडण्याची कार्यवाही न केल्यास वेळप्रसंगी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
महावितरण च्या पठाणी वसुली, वसुल न झाल्यास रोहित्राचा विद्युत पुरवठा बंद करणे या त्रासामुळे बळीराजा मेटाकुटीस आला असल्याचे चित्र आढळून येत आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती तुन वाचलेली पिके जगविताना करावी लागणारी कसरत त्यात विहिरींना पाणी असून ही विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जाळून जात असून जनावरांचे ही पिण्याचे पाण्याचे हाल होतआहेत.
मागील दोन तीन महिन्यापूर्वी ही महावितरण ने अशीच वसुली चालू केली होती, त्यावेळी ही शेतकऱ्यांनी काही प्रमाणात बिल भरली होती तर काहींनी भरली नव्हती.
प्रामाणिक पणे बिल भरणाऱ्या शेतकरांवर अन्याय होत आहे.
या प्रसंगी मुळा प्रवरा इले. सोसायटी चे संचालक मछिंद्र अंत्रे, राहुरी तालुका भाज पा चे उपाध्यक्ष नारायण धनवट, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक सुभाषमामा अंत्रे, विखे साखर कारखाना चे संचालक सुभाष अंत्रे, राजेंद्र अनाप, भाजपा ओबीसी युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष किरण अंत्रे, मोहम्मदभाई तांबोळी, रवींद्र दिघे, डॉ. प्रदीप दिघे, बाळासाहेब अंत्रे, अमित दिघे, दत्तात्रय शिंदे, ज्ञानदेव अंत्रे, चंद्रकांत अंत्रे, चंद्रकांत अनाप, भास्करराव घोलप, तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्तिथ होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत