कोपरगाव प्रतिनिधी :- प्रत्येक महिला सक्षम आहे परंतु सर्वच महिलांना आपल्यात असणाऱ्या सामर्थ्याची जाणीव नाही. त्यामुळे आजही अनेक महिला समा...
कोपरगाव प्रतिनिधी :-
प्रत्येक महिला सक्षम आहे परंतु सर्वच महिलांना आपल्यात असणाऱ्या सामर्थ्याची जाणीव नाही. त्यामुळे आजही अनेक महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात वावरतांना दिसत नाही. अशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून विविध घरगुती व्यवसायांचे प्रशिक्षण देवून स्वयंपूर्ण करण्याची मोहीम प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहे. महिलांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होवून आपल्यातील सामर्थ्याच्या जोरावर स्वयंपूर्ण व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन-कृषी विभाग आत्मा अंतर्गत भोजडे चौकी, कान्हेगाव येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिलांसाठी शेळी दूध व दुग्ध व्यवस्थापन प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी उपस्थित बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, महिला या सक्षमच असतात त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जावू शकतात. त्यामुळे आज अनेक व्यवसायात महिला आघाडीवर आहेत.बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सौ. पुष्पाताई काळे, श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही वर्षापासून दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यापुढील काळात बचत गटाच्या महिलांना मदत करून बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कृषी विभागाचे अविनाश सावंत, शैलेश आहेर, शकुंतला सांगळे, सुमन कडेकर, मंदाकिनी चौधरी, शांता चौधरी, कल्पना चौधरी, जयश्री काळे, बबनराव सांगळे, देवचंद कडेकर, दिपक भाकरे, रामकृष्ण सोळसे, लक्ष्मण चौधरी, रविंद्र सांगळे, संदीप काळे, बाबासाहेब कडेकर, बाळासाहेब पवार, संतोष सांगळे आदींसह कान्हेश्वर बचत गट, कचेश्वर बचत गट, गंगा बचत गट, नीळकंठेश्वर बचत गट, जय मल्हार बचत गट, जय बजरंग बचत गट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बचत गट, जय गजानन बचत गट, राजा विरभद्र बचत गट, साई महिमा बचत गट, साईच्छा बचत गट आदी बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत