राहुरी : वेबटीम उंबरे सोसायटीसाठी सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र ही निवडणूक वरवर 'कांटे की टक्कर' दिसत असल...
राहुरी : वेबटीम
उंबरे सोसायटीसाठी सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र ही निवडणूक वरवर 'कांटे की टक्कर' दिसत असली तरी सभासदांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने निकाल धक्कादायक लागणार असल्याची हवा तयार झाली आहे. सध्या उंबरेत दुरंगी लढतिचे चित्र स्पष्ट झाले असून, दोन्ही गटांना विजयाची संधी असली तरी आता अर्ज माघारीवर आणि अंतिम उमेदवारी वाटपावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी जनसेवा मंडळाकडून कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, माजी संचालक सुनील अडसुरे तर विरोधी गणराज शेतकरी मंडळाकडुन कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग व माजी संचालक नवनाथ ढोकणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, या निकालावर आगामी राजकारणाची दिशा ठरणार असल्याने या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
उंबरे सोसायटीच्या 13 जागांसाठी तब्बल 73 अर्ज दाखल झाले आहेत, यात सर्वाधिक इच्छुक हे गणराज शेतकरी मंडळाकडे दिसत आहेत, या मंडळाने आपल्याकडे 40 इच्छुकांचे अर्ज असल्याचा दावा करत आमच्याकडे असलेला हा कल म्हणजे आमचा गुलाल आहे, असा विश्वास व्यक्त करत आहेत, तर काहीजण ग्रामपंचायतीपेक्षा मोठी लाट या निवडणुकीत पहायला मिळेल, असे बोलून दाखवत आहेत, मात्र, उमेदवारी देताना आणि अर्ज माघारी काढताना श्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे. दुसरीकडे सत्ताधारी गटातही जोरदार व्यूहरचना सुरू आहेत, सत्ताधारी मंडळाची एक जागा बिनविरोध आली आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, माजी संचालक सुनील अडसुरे यांनी सत्ता कायम राखण्यासाठी बेरजेचे राजकारण केले आहे, उमेदवारी देताना या सत्ताधारी गटाने नात्या गोत्याचा, त्यांच्या मतांचा, भावकीचा विचार सुरू केला आहे, त्यामुळे उमेदवार तगडे देऊन आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होऊ, असा त्यांना विश्वास आहे, तर दुसरीकडे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, नवनाथ पाटील ढोकणे, कारभारी ढोकणे, पै गंगाधर ढोकणे , इंजि गोरक्षनाथ दुशिंग, आदी नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधार्यांना सोसायटीतुन पायउतार करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यांनीही नाते गोते, भावकी, मतांची बेरीज विचारात घेऊन उमेदवाऱ्या देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे, ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा गणराज मंडळाचा उत्साह वाढविणारा आहे, त्यात कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे यांची ताकद मिळाल्याने गणराज मंडळाने 12 जागांवर गुलालाची तयारी करून ठेवली आहे
एकूणच, ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची बनवली आहे, दोन्ही गटाकडे मातब्बर नेते आहे, दोन्ही गटात कारखान्याचे माजी संचालक तथा सहकारातील अनुभवी नेते आहे, आता 10 वर्षात आपण केलेली कामे सभासदांपर्यंत पोहचविण्यात सत्ताधारी यशस्वी होतात की सत्ताधारी मंडळाचे 10 वर्षातील वाभाडे काढण्यात विरोधक यशस्वी होतात, याकडे जनतेचे लक्ष असणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे युवानेते संदीप दुशिंग यांनी गणराज मंडळासाठी युवकांची बांधणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत