कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बक्तरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत ...
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बक्तरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत काळे गटाच्या सौ.राधाबाई धर्मराज नागरे यांची निवड करण्यात आली आहे.
बक्तरपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच शिवाजी सानप यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत काळे गटाकडून सौ.राधाबाई नागरे यांनी उपसरपंच पदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. तर विरोधी गटाकडून सौ. सरला सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पार पडलेल्या निवडणुकीत राधाबाई नागरे यांना व विरोधी गटाच्या सौ. सरला सानप यांना समसमान ३ मते पडली होती. त्यावेळी दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून निवड करण्यात आली. यामध्ये काळे गटाच्या राधाबाई नागरे यांच्या नावाची चिट्ठी निघाल्यामुळे त्यांना उपसरपंचपदाची लॉटरी लागली.त्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामविकास अधिकारी एफ.एम.तडवी यांनी राधाबाई नागरे यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर केली. यावेळी उपसरपंच सौ.राधाबाई धर्मराज नागरे, सदस्य गणेश सानप, विशाल सानप, सौ.ताईबाई पवार, अशोक सानप, सोमनाथ सानप आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच सौ.राधाबाई नागरे यांचे मा.आ.अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत