अहमदनगर(वेबटीम) मागील वर्षीही पर्जन्यमान चांगले झालेने राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी ऊस या हमखास दोन पैसे मिळत असलेल्या पिकासाठी ...
अहमदनगर(वेबटीम)
मागील वर्षीही पर्जन्यमान चांगले झालेने राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी ऊस या हमखास दोन पैसे मिळत असलेल्या पिकासाठी पसंती दिली होती. शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जवळील कारखान्यांना लागवडीच्या नोंदीही दिल्या होत्या. सदर नोंदीवर साखर आयुक्त पुणे यांनी गाळप -हंगाम 2021-22 साठी क्रशिंग लायसनही दिले. या सर्व बाबीची नोंद कारखान्यासह सरकारकडेही होती. आज रोजी कारखाने अजूनही ऑक्टोबर, नोव्हेबर व डिसेंबर मधील लागवड केलेल्या पिकाचे हार्वेस्टिंग करत आहे.
काही कारखान्याच्या शेतकीच्या माहितीवरून सदर लागवड प्रोग्रॅमसाठी तीस दिवसाचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच त्यासाठी किमान दहा मे उजाडणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे मधील लागवड किमान प्रत्येक कारख्यान्याकडे दीड ते दोन लाख मेट्रिक टनांची आहे. त्याचबरोबर मागील वर्षी जानेवारी ते मे मध्ये तुटलेले सुरु खोडव्याचे क्षेत्र प्रत्येक कारखान्याकडे चाळीस टक्के गृहीत धरल्यास खोडवा चार लाख टनांच्या आसपास शिल्लक आहे. साहजिकच आज अखेर प्रत्येक कारखान्याकडे पाच लाख टनांच्या आसपास ऊस शिल्लक आहे. त्यातील पन्नास दिवसात सरासरी जास्तीतजास्त दोन लाख टनाचे गाळप होऊ शकते. तापमानात वाढ झालेने मजुराची काम करण्याची क्षमताही कमी झाली आहे. ऊस तोड मजुराच्या उचली फिटल्याने मजूर कारखाने सोडून त्यांच्या गावी चालले आहे. सर्वच कारखान्याकडे ऊस उपलब्द असलेने हार्वेस्टर मशीनचाही तुटवडा भासत आहे. हार्वेस्टरसाठी लवकर पाणी तोडावे लागत असलेने. पाणी बंद करूनही वेळेत तोडी नसलेने उभे ऊस वाळून गेलेने मशिनमधून भुस्साच बाहेर फेकला जात आहे.
ऊसाचे प्लॉट वाळलेने खराब झाले आहे. त्यामुळे मजुरांना ऊसाच्या भुरीच्या त्रास होत आहे. साहजिकच ऊस तोड मजूर ऊस जाळून तोडत असलेने ऊसाची अक्षरशः राख होत आहे. त्यातही मजुरासह हार्वेस्टरलाही शेतकऱ्यांना कारखान्या व्यतिरिक वेगळे पैसे मोजावे लागत आहे. मार्च नंतर तुटलेले ऊस पिकाना दहा ते वीस टनाचे ऍव्हरेज मिळत आहे. ही सर्व बिकट परिस्तिथी कारखाना व्यवस्थापण समितीला ज्ञात असूनही सर्व ऊसाचे गाळप होईल असे शेतकऱ्यांना सांगण्यात येते. काही कारखाने तर खोडवा पिके आता तोडूच शकत नाही कारण सदर प्रोग्रामप्रमाणे हरवेस्टिंग गृहीत धरल्यास खोडवा पिके तोडण्यास कारखान्याकडे पिरियड शिल्लक राहत नाही. वास्थाविक खोडवे तोडण्याच्याही अवस्थेत राहणार नाही. ही सर्व अतिरिक्त ऊसाची गंभीर परिस्थितीची जाणीव कारखाना व्यवस्थापन समित्या व सरकारला मागील वर्षीच होती. तरी या सर्व ऊस उत्पादकाच्या नुकसानीस त्या त्या कारखान्याचे संचालक मंडळ व सरकार जबाबदार आहे. कारखान्यांनी गाळप क्षमेतेपेक्ष्या जास्तीच्या नोंदी घेतल्या नसत्या तर शेतकऱ्यांनी ऊस लागवडी थांबवून दुसरे पिके लागवडीसाठी निवडली असती. मागीलवर्षीही दोन ते तीन महिने उशिराने हार्वेस्टिंग झालेने एकरी टनेज घटले होते. गुजरातमधील गावदेवी सारखा कारखाना 3700 /--रुपये पर्यंत दर देतो व आपले पुरोगामी महाराष्ट्रातील स्वयम घोषित लोकनेते, सहकार महर्षी, जाणते राजे 2000 /--रुपये ते 2400 /--रुपयेच्या पुढे दर देण्यास तयार नाही. अतिरिक्त ऊसाचे अपघाताने निर्माण झालेले संकट नसून कारखाने व सरकार यांनी संगनमताने पूर्वनियोजित एक षडयंत्रच आहे. आज शेतकऱ्यांना काय भाव द्यायचा तो द्या पण ऊस तोडून घेऊन जा म्हणण्याची वेळ आली. या सर्व बाबीना दोन साखर व दोन इथेनॉल कारखान्यातील हवाई 25 किमी अंतराची अट प्रमुख समस्या आहे . तरी सदर अट रद्द करणे सह स्व. गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळाची शेतकऱ्याच्या बिलातूल होणारी दहा रुपये प्रति टन कपात रद्द करावी,मार्च, एप्रिल व मे मध्ये उशिराने तुटलेल्या ऊसाला एकरी 25000 /-रुपये, गाळप न झालेल्या शिल्लक ऊसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, वीजबिल, पाटबंधारे विभागाची पाणीपट्टीसह संपूर्ण कर्जमाफी मिळावी आदी मागण्यांसह सविस्तर 16 एप्रिल 2022रोजी, वार शनिवार, वेळ ठीक 11वा. लक्ष्मी त्रिंबक मंगलकार्यालय, नेवासा रोड श्रीरामपूर ता श्रीरामपूर येथे मा. रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष व मा. ऍड अजितराव काळेसाहेब उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्ज्य यांच्यासह आदी शेतकरी नेत्याचे मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहान्याचे आव्हाहन अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत