आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केले 'हे' आवाहन👇🏻 - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केले 'हे' आवाहन👇🏻

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, हनुमान जयंती, रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर  सोशल मीडियावर कुठल्याही प...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, हनुमान जयंती, रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर  सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्य पोस्ट टाकून  सामाजीक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.


राहुरीचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी राहुरी तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले की, राहुरी तालुक्यात सामाजिक तेढ निर्माण होईल  कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य किंवा घोषणा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, हनुमान जयंती, रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर करू नये.

सोशल मीडियावर कुठल्याही आक्षेपार्ह प्रकारची पोस्ट व्हायरल अथवा व्हिडिओ व्हायरल करू नये.जर कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल करत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावे जेणेकरून पोलीस विभागातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जर कोणीही चुकीचे कृत्य करताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दराडे यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत