राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेस ६१ लाख रुपये नफा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेस ६१ लाख रुपये नफा

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) आर्थिकदृष्ट्या नगर जिल्हयामधे अग्रेसर असलेल्या तसेच राहूरी फॅक्टरी येथे मुख्य कार्यालय असलेल्या आदर्श नागरी सहकारी पत...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



आर्थिकदृष्ट्या नगर जिल्हयामधे अग्रेसर असलेल्या तसेच राहूरी फॅक्टरी येथे मुख्य कार्यालय असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेस यावर्षी सर्व तरतूदी करुन ६१ लाख रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन आण्णासाहेब चोथे यांनी दिली.


माजी खासदार प्रसाद तनपुरे व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेने राहुरी तालुका व जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यामुळे व अर्थकारणामुळे नावलौकिक प्राप्त केलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेस सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षामधे कोरोना सारख्या महामारीच्या परिस्थितीतदेखील काटेकोर आर्थिक व्यवहार करत ६१ लाख रुपयांचा नफा झाला आहे.


 त्याच बरोबर संस्थेने आर्थिक वर्षात ६१ कोटी रुपये ठेवीचे उद्दीष्ट प्राप्त केले आहे. या संस्थेची स्थापना सन १९९३ साली झाली असून २९ वर्षाच्या वाटचालीमध्ये संस्थेने सातत्याने प्रगतीकडे वाटचाल करीत इतरांना आपला आदर्श घालून दिला आहे. ३१ मार्च २०२२ अखेर संस्थेने ६१ कोटी रुपये ठेवींचा पल्ला गाठला असून ४० कोटी रुपयेचे कर्ज वाटप केले आहे.


संस्थेच्या चालू आर्थिक वर्षात २६५ कोटी रुपयांची आर्थीक उलाढाल व केली असून संस्थेचे खेळते भागभांडवल ७० कोटी ५ लाख रुपये एवढे असून भागभांडवल ८८ लाख रुपये आहे. तसेच संस्थेचा स्वनिधी २ कोटी ६० लक्ष रुपये असुन १९ कोटी रुपयांची  सुरक्षित गुंतवणुक केली आहे. संस्थेच्या २९ वर्षांच्या वाटचालीमध्ये ठेवीदार, कर्जदार, व सभासदांना विनंती व तत्पर सोने तारण कर्ज, वाहन तारण कर्ज ,मेंबर कर्ज, लॉकर सुविधा या सेवा कमीत कमी कागदपत्रामध्ये व आकर्षक व्याजदरामधे उपलब्ध करून दिले असून संस्थेचा लवकरच आरटीजीएस, एन.एफ.टी व आधुनिक कोअर बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा संस्थेचा मानस आहे.


संस्थेचा स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग 'अ' राहीलेला असून संस्थेस आपल्या कार्यतत्परतेमुळे सर्वसामान्य ठेवीदार, कर्जदार यांचा विश्वास संपादित केला आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण अहमदनगर जिल्हा असुन संस्थेचे राहुरी फॅक्टरी येथील मुख्य कार्यालयासह राहुरी, मांजरी, कोल्हार, वांबोरी येथे शाखा कार्यरत आहे. या सर्व यशामध्ये संस्थेचे व्हा. चेमरमन सुधाकर कदम संस्थेचे सर्व संचालक, मॅनेजर, सर्व शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी कलेक्शन एजंट यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच हि संस्था अधिक वेगाने प्रगती करीत असल्याचे आण्णासाहेब चोथे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत