कोपरगाव(वेबटीम) श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला सन १९७७-७८च्या माजी विदयार्थी व प्रसिध्द अभिनेते श्री.माधव अभ्यंकर तथा आण्णा नाईक यांनी नुकत...
कोपरगाव(वेबटीम)
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला सन १९७७-७८च्या माजी विदयार्थी व प्रसिध्द अभिनेते श्री.माधव अभ्यंकर तथा आण्णा नाईक यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.त्या प्रसंगी ते भावुक झाले. शिक्षकांशी संवाद साधतांना ते म्हणाले की माझ्या वर शाळेने घडवलेल्या संस्कारा मुळेच मी घडलो.माजी मुख्याध्यापक आर.जी.को-हाळकर यांनी मला केलेल्या मार्गदर्शनामुळे मी अभिनया कडे ओढलो गेलो.माझ्या व्यक्तीमत्वच्या जडणघडणी मध्ये शाळेचा सिंहाचा वाटा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी सिने अभिनेते श्री.माधव अभ्यंकर आपल्या शालेय जीवनातील सहकारी श्री.सुनिल बोरा,सुधिर डागा,एस.पी.कुलकर्णी,अनिल उत्पात,श्री.बाळासाहेब कुर्लेकर यांच्या सह विद्यालयात आले.त्यांचा असलेल्या इ.१०वी ब च्या वर्गात ते गेले.शालेय परीसर फीरुन त्यांनी गत शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला.आमच्या सर्वाच्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या आहे.असेही ते म्हणाले.विद्यालयात आल्याने आम्हांला एक वेगळी उर्जा मिळाली असुन त्याचा पुढील वाटचालीत आम्हांला निश्चित वापर होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला श्री.माधव अभ्यंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.विदयालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे यांनी शाल व बुके देवुन सत्कार केला.या प्रसंगी माजी विद्यार्थी अनिल उत्पात,सुधिर डागा यांनी आपले विचार व्यक्त केले.
विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी माधव अभ्यंकर यांनी विदयालयात पुन्हा येवुन विदयार्थीना मार्गदर्शन करावे असे सुचवले.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,संदीपअजमेरे,सुनिल अजमेरे या प्रसंगी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी केले.तर आभार उपमुख्याध्यापक श्री.आर.बी.गायकवाड यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत