गुहा येथील वाबळे वस्ती येथे श्री.साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा येथील वाबळे वस्ती येथे श्री.साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील तांभेरे रोड परिसरातील वाबळे वस्ती येते सोमवार दिनांक 18 एप्रिल ते रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ ...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील गुहा येथील तांभेरे रोड परिसरातील वाबळे वस्ती येते सोमवार दिनांक 18 एप्रिल ते रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ या श्री.साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त श्री. साई सच्चरीत् पारायण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

 गुहा येथील वाबळे वस्ती येथे साईनाथांचे मंदिर उभारण्यात आले असून या ठिकाणी श्री साईबाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.


त्यानिमित्ताने सोमवार दिनांक १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान सकाळी ७ ते ११ या वेळेत साई सच्चरित्र ग्रंथ वाचन संपन्न होणार आहे.


त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत साई भजन संध्या तर सोमवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता श्री.साईबाबा मंदिर कलशारोहन माजी खा.प्रसाद तनपुरे व डॉ.सौ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. चरण पादुका पूजन विकास महाराज रूणवाल यांच्या हस्ते पार पडणार आहे.


साईबाबा मंदिर कलशारोहण यानिमित्ताने ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक(नेवासेकर)यांचे सायंकाळी ४ते ६ या वेळेत हरिकीर्तन व महाप्रसाद वाटप होणार आहे. या कार्यक्रमास उर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत.



 या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती द्रौपदाबाई गोरक्षनाथ वाबळे, श्री.सुरेश गोरक्षनाथ वाबळे(विश्वस्त, शिर्डी संस्थान) , चंद्रभान गोरक्षनाथ वाबळे, इंद्रभान गोरक्षनाथ वाबळे व समस्त वाबळे परिवार व वाबळे वस्ती परिसरातील साईभक्त व नागरिकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत