शालेय विद्यार्थ्यांसाठी फिरते आधार सेंटर सुरु करा – रोडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शालेय विद्यार्थ्यांसाठी फिरते आधार सेंटर सुरु करा – रोडे

आंबी(वेबटीम)  श्रीरामपूर विभागासह संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण विभागात संचमान्यतेचे काम सुरु आहे. तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत नवविद्या...

आंबी(वेबटीम)



 श्रीरामपूर विभागासह संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण विभागात संचमान्यतेचे काम सुरु आहे. तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत नवविद्यार्थी व पालक यांचे शाळापूर्वतयारी कार्यक्रम सुरु झाले आहेत. ग्रामीण भागात लहान मुलांचे आधारकार्ड उपलब्ध नसल्याने शाळेत प्रवेश घेताना व शाळा प्रवेश झालेनंतर संचमान्यता मिळवताना आधारकार्ड अभावी शिक्षकांना मुलांचा ऑनलाईन डेटा भरता येत नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश पालक वर्ग अल्पशिक्षित असल्याने व रोजी-रोटीसाठी भटकंती करावी लागत असल्याने मुलांच्या शालेय बाबींकडे लक्ष देण्यात दुर्लक्ष करतात. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांसाठी फिरते आधार सेंटर सुरु करावे अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हंटले आहे की, संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अनिवार्य असल्याने याची सर्व जबाबदारी ही शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचे काम सोडून विद्यार्थ्यांना घेऊन आधार सेंटरसमोर रांगेत उभे रहावे लागत आहे. याचा सर्वस्वी परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत असून गुणवत्ता ढासळली जात आहे. तसेच उपविभागात आधार कार्ड सेंटरची संख्या अत्यल्प असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांना घेऊन उपाशीपोटी तालुक्याच्या ठिकाणी दिवसभर ताटकळत थांबावे लागते. काही ठिकाणी आधार सेंटर चालकांकडून अशा विद्यार्थी, शिक्षक व पालकांची अडवणूक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत.

 

या सर्व बाबींचा विचार करून आपण आपल्या कार्यालयामार्फत श्रीरामपूर उपविभागात शालेय विद्यार्थ्यांसाठी फिरते आधार सेंटर सुरु करावे. जेणेकरून विध्यार्शी, पालक व शिक्षकांचे हाल होणार नाहीत. याकामी आपल्याला गटशिक्षणाधिकारी, प्राशासन अधिकारी यांच्याकडे वरील विध्यार्थी व शाळांची माहिती उपलब्ध होईल. यासाठी सदर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना ‘नोडल ऑफिसर’ नेमल्यास हे काम मिशन मोडवर पूर्ण करता येऊ शकेल. धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत