कर्जत येथे बार्टी पुणे तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्जत येथे बार्टी पुणे तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

  कर्जत(वेबटीम) डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने दा...

 कर्जत(वेबटीम)



डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे स्पर्धा परीक्षा-  एक सुवर्णसंधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

  या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून  कर्जत उपविभागीय पोलीस उपअधीक्षक मा.श्री.आप्पासाहेब जाधव  ,कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून  महाविद्यालय चे प्राचार्य मा.श्री.डाॅ. संजय नगरकर व प्रमुख पाहुणे म्हणून  कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक मा.श्री.भास्कर भैलुमे , बार्टीचे अहमदनगर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी मा श्री दिलावर सय्यद, समतादूत पिरजादे एजाज उपस्थित होते . यावेळी पोलीस उपअधीक्षक मा श्री आण्णासाहेब जाधव यांनी उपस्थित विद्यार्थी ना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो परंतु मार्गदर्शन मिळत नसल्याने त्या विद्यार्थ्यांना ना अडचणी येतात परंतु बार्टी मार्फत विद्यार्थीना अशा प्रकारे मार्गदर्शन मुळे निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन केले. बार्टीचे अहमदनगर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी मा श्री दिलावर सय्यद यांनी बार्टी च्या प्रकल्पाविषयी व स्पर्धा परीक्षा केंद्राविषयी माहिती देऊन बार्टी व  समाजकल्याण कार्यालय मार्फत राबविण्यात येणारे योजना विषयी माहिती उपस्थितीताना दिली. अध्यक्षीय भाषणात डाॅ. संजय नगरकर यांनी विद्यार्थी नी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावे असे आव्हान यावेळी केले.

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालय चे स्पर्धा परीक्षा केंद्राचे डाॅ रोडगे के.डी यांनी केले.यावेळी महाविद्यालय चे प्रा.कुंभार डी.एस, प्रा.कुंभार बी.एन.,प्रा.दळवी आर.डी, प्रा.काळे आर.डी .तसेच महाविद्यालय  शिक्षकत्तेर कर्मचारी,  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्जत तालुक्यातील बार्टी च्या युवा गटातील सदस्यानी विशेष सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत