विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण,विज वितरण अधिकार्‍यांचे मोबाईल मात्र स्वीचऑफ. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण,विज वितरण अधिकार्‍यांचे मोबाईल मात्र स्वीचऑफ.

  देवळाली प्रवरा(वेबटीम) महावितरणाच्या राञीच्या भारनियमामुळे देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरीकर झाले ञस्त, अधिकाऱ्यांसह वायरमन, सबस्टेशनवरील कर...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

महावितरणाच्या राञीच्या भारनियमामुळे देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरीकर झाले ञस्त, अधिकाऱ्यांसह वायरमन, सबस्टेशनवरील कर्मचारी मोबाईल स्विच ऑफ करून बिनधास्त झाले आहेत.राञीचा विज पुरवठ्याचे भारनियमन केल्यामुळे उष्णतेच्या उकाड्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्याच बरोर राञीच्या अंधारात डासांचा उपद्रव अधिक वाढला आहे. डासांचा उपद्रव वाढलेला असतानाही पालिका प्रशासन कोणतीही फवारणी करण्याच्या परीस्थित नाही.नाशिक येथिल ठेकेदारास फवारणीसह आरोग्य विभाचा ठेका दिला आहे. तो ठेकेदार उंटावरुन शेळ्या हकण्याचे काम करीत आहे. 


            

  देवळाली प्रवरा  व फॅक्टरी परिसरात   दुपारी व रात्री उशिरा वीज भारनियमन केले जात असल्यामुळे नागरीक ञस्त झाले आहे.राञी झोपायच्यावेळी विजेचे भारनियमान केले जात असल्यामुळे  नागरिक उकाड्यामुळे इतके हैराण झाले आहेत की, रात्र रात्र जागून काढत आहेत. विजेची माहिती घेण्यासाठी अधिकारी, वायरमन, सबस्टेशन मधील कामगार यांच्याकडे  भ्रमणभाषवर संपर्क साधण्याचा केला असता भ्रमणभाष (मोबाईल) बंद करुन ठेवीत असल्याने किती तासाचे भारनियमन केले आहे. कधी लाईट हे माञ सर्वसामान्य वर्गाला समजू शकत नाही. 

                    महावितरणाने नागरिकांची झोप उडवायची आणि दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी आरामशीर झोपायचे असा प्रकार सध्या या विभागात सुरू आहे.भारनियमाची कोणतीही माहिती दिली जात नाही. पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजनही कोलमडले आहे. शहराला होणारा पाणी पुरवठा उशिरा करावा लागत आहे.

           विज पुरवठा कधी होणार याची माहिती घेण्या करीता अधिकारी, वायरमन, सबस्टेशन कर्मचारी यांच्या भ्रमणभाषवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे भ्रमणभाष भारनियमन काळात बंद ठेवले जातात. 

             विज बीलाची वसुली घरगुती ग्राहकाकडून  दमबाजी करून कायद्याची भाषा वापरुन त्याचा धाक दाखवत वसुली करण्याचा धडाका महावितरणने चालविला आहे.शहरी भागात थकबाकीचे प्रमाण कमी असतानाही भारनियमन का केले जाते असा विज ग्राहकांनी केला आहे. महावितरणाने घरगुती ग्राहकांना शेती प्रमाणे विज पुरवठा सुरु केला की काय असा प्रश्न विज ग्राहकांनी केला आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे.उष्णतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लहान मुलांन पासुन ते मोठ्या व्यक्तींपर्यत सर्वांना उकड्याचा ञास होत आहे. 

            शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे.माञ फवारणी करण्याकडे नगर पालिकेसह ठेकेदाराचे  दुर्लक्ष होत आहे. फवारणी व स्वच्छता विभागाचा ठेकेदार नाशिक येथून उंटावरुन शेळ्या वळवत आहे.गेल्या महिन्यात एकदाहि फवारणी केली नसल्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे. 

             भारनियमन रद्द व डासांची फवारणी न झाल्यास विविध संघटना आंदोलनाच्या पविञ्यात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत