होय, मुली हुशारच:.नामदेवराव ढोकणे आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी भाग शाळा उंबरे येथे मार्च 22 मध्ये झालेल्या इयत्ता ...
होय, मुली हुशारच:.नामदेवराव ढोकणे
आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी भाग शाळा उंबरे येथे मार्च 22 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीचा विद्यालयाचा निकाल 97.56 टक्के लागला परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान नुकताच उंबरे येथे करण्यात आला
अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्री भाऊराव पाटील ढोकणे हे होते तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नामदेव पांडुरंग ढोकणे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी चेअरमन नामदेव ढोकणे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच मुलांपेक्षा मुलींमध्ये गुणवत्ता अधिक असल्याचे सांगितले तसेच शाळेच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडवल्या जातील, असे सांगितले तसेच शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले
भाऊराव ढोकणे बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांचे अथक प्रयत्न आणि शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन यामुळे विद्यालयाची निकराची परंपरा कायम राहिली आहे विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक केले
यावेळी पर्यवेक्षक गोरक्षनाथ उगले वर्गशिक्षक पंकज पवार अजेंद्र दुधे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
1) ढोकणे कोमल जनार्धन प्रथम 92.8
2) जाधव श्रेयसी शिवाजी द्वितीय 92.4
3) घाडगे प्राजक्ता बापूसाहेब तृतीय 91.2
4) ढोकणे श्रावणी नामदेव चतुर्थ 90.6
5) ढोकणे साक्षी दत्तात्रेय पाचवा89.8
6) ढोकणे समृद्धी संतोष पाचवा 89.8
यावेळी साहेबराव क्षिरसागर, बापूसाहेब घाडगे, गोविंद गवळी, नामदेव गणेश ढोकणे, विजय माळवदे, पर्यवेक्षक गोरक्षनाथ उगले, संजय जाधव, पंकज पवार , अजेंद्र दुधे, चांगदेव मरभळ शिवाजी जाधव, मच्छिंद आडसुरे, बापूसाहेब ढोकणे, रामदास गोडे, नवनाथ महापुडे, मिलिंद राऊत, संतोष बेलेकर, रावसाहेब पवार, श्रीमती सुरेखा कदम तसेच ग्रामस्थ व विद्यार्थिनींचे माता-पालक व विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब कदम यांनी केले तर आभार जालिंदर दुशिंग यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत