काय तो रस्ता, काय ते खड्डे, प्रवास करताना दुखते कंबेरडे " - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काय तो रस्ता, काय ते खड्डे, प्रवास करताना दुखते कंबेरडे "

  सात्रळ(वेबटीम) सात्रळ -माळेवाडी रस्त्यावरील   रयत विध्यार्थी  वसतिगृह  ते डुक्रेवाडी पाटाचा पुलापर्यंत  रस्त्याला अनेक ठिकाणी  खड्डे  पडल्...

 सात्रळ(वेबटीम)

सात्रळ -माळेवाडी रस्त्यावरील   रयत विध्यार्थी  वसतिगृह  ते डुक्रेवाडी पाटाचा पुलापर्यंत  रस्त्याला अनेक ठिकाणी  खड्डे  पडल्याने या रस्त्याने जाणारे येणारे  कॉलेज  विध्यार्थी  विद्यार्थिनी, ग्रामस्थ, दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक वैतागले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, या रस्त्याची तातडीने  दुरुस्तीची मागणी  परिसरातील  हंभीरराव चोरमुंगे, कारभारी  मारुती  डुक्रे, प्रवरा  ट्रक सोसायटी  चे संचालक  प्रमोद नालकर,वर्धमान चोरमुंगे,  बापूसाहेब  शिंदे, सुनील नालकर, गज्याबापू हरिभाऊ  शिंदे तसेच कॉलेज  विद्यार्थी यांनी केली आहे. 



सात्रळ कॉलेज , डुक्रेवाडी, माळेवाडी, कानडगाव तसेच इतर गावांना जाण्यासाठी  हा वर्दळीचा  रस्ता आहे. एकट्या सात्रळ कॉलेजलाच सायकल वरून येणाऱ्या विधार्थी संख्या  मोठी असून याच रस्त्याने दूध उत्पादक, शेतकरी, ग्रामस्थांची मोठी वर्दळ  असते. या रस्त्याने दुचाकी, चारचाकी  ने प्रवास करताना खड्डे हुकविण्याची कसरत करत वाहनांचे सारखे गियर  बदलत चालावे लागत असून अनेकांना पाठीचे दुखणे  लागले आहे तसेच वाहनांचे नुकसान  होत असल्याने आर्थिक फटका  सहन करावा लागत असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्याची मागणी होत आहे. यापूर्वीही  अनेक  वेळेस नागरीकांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली गेली होती पण  प्रशासनाने दुर्लक्ष  केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत