राहुरी(वेबटीम) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) पक्षाचा वर्धापनदिनानिमित्त व राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय ता...
राहुरी(वेबटीम)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) पक्षाचा वर्धापनदिनानिमित्त व राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तर वांबोरी व कात्रड येथील एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दीपक निकाळजे यांचे नेतृत्व मान्य करून आंबेडकर पक्षात प्रवेश केला.
२७ जुलै रोजी आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा वाढदिवस व पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त वारकरी संप्रदायातील विद्यार्थी वस्तीगृह, वांबोरी येथील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी वांबोरी व कात्रड येथील एकलव्य संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आरपीआय आंबेडकर पक्षात प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य कार्याअध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशीकांत दारोळे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या नेतृत्वाखाली व राहुरी तालुका अध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
अमोल जाधव, राम जाधव,रामदास बर्डे, लक्ष्मण जाधव,रावसाहेब निकम पवन माळी, गोरक जाधव मच्छीद्र जाधव, कैलास कुसमुडे,सुरेश पवार, सोमेश्वर निकम, गंगा बर्डे,सुनिल पवार,सोनू जाधव,अमोल कुसमुडे,अजय मेंढेकर, भाऊराव पवार,राजू माळी,अजय बर्डे,बाबू बर्डे,चंदू माळी,रामदास पवार, विठ्ठल पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष मकासरे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत आहे. निश्चित आगामी निवडणुकीत ही सर्व ताकद एकवटून दीपक निकाळजे यांचे हात बळकट करण्यासाठी सज्ज झालो आहोत. या वेळी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याचा सन्मान मकासरे यांनी करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत