राहुरी फॅक्टरी(वेबटीम) शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील राहुरी फॅक्टरी श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्स व टायपिंगच्या वतीने परिसरातील गावांतील...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील राहुरी फॅक्टरी श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्स व टायपिंगच्या वतीने परिसरातील गावांतील विविध शाळेतील शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, नूतन माध्यमिक विद्यालय , नु प्रसाद विद्यालय, कणगर तसेच ओम कवाणे क्लासेस ,येवले इंग्लिश क्लासेस, गांडूळे गणित क्लासेस आदी शाळेमध्ये जाऊन 200 शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले.
तसेच एमकेसीएलच्यावतीने आयटीआय जिनियस2022 च्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा आयोजित करण्यात करण्यात आली असून सदर परीक्षेत पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात व त्यांना वयोगटानुसार 5 लाख ६५ हजारांची रोज स्वरूपातील बक्षिसे वाटप करण्यात येणार आहेत याबाबतची माहिती योगेश आंबेडकर यांनी दिली.
यावेळी संस्थेचे श्री योगेश आंबेडकर सर, कांचन आंबेडकर, अनुष्का येवले ,वैष्णवी शेटे, सीमा देशमुख, जयश्री सावरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक गणेश आठरे, मयूर तोडमल, गणेश मोकाटे ,भाऊसाहेब आठरे आदींचे मार्गदर्शन लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत