दोन बिबट्यांंपुढे 'त्याची' ताकद कमी पडल्यानं घेतला अखेरचा श्वास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दोन बिबट्यांंपुढे 'त्याची' ताकद कमी पडल्यानं घेतला अखेरचा श्वास

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील माजी नगरसेवक व व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष विश्वास पाटील यांच्या वस्तीवर ब...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील माजी नगरसेवक व व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष विश्वास पाटील यांच्या वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला असून  दोन  बिबट्यांच्या   हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार झाला.  दोन बिबट्यापुढे टोनी नामक पाळीव कुत्र्याची ताकद कमी पडल्याने त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. अत्यंत प्रामाणिक असलेल्या टोनी नामक पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर पाटील यांनी घराजवळील शेतात त्यांचा अंत्यविधी केला.


गेल्या काही दिवसांपासून देवळाली प्रवरा परिसरातील वाड्या वस्त्यांवर बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाला आहे. सोमवारी रात्री विश्वास पाटील यांच्या टोनी नामक पाळीव कुत्र्यावर दोन बिबट्याने हल्ला चढविला. दोन्ही बिबटयाना प्रतिकार करण्याचा प्रयत्न टोनीने केला. मात्र दोघांपुढे टोनीची ताकद कमी पडली आणि त्याला गतप्राण व्हावे लागले. अतिशय प्रामाणिक असलेल्या टोनी हा पाळीव कुत्रा मृत झाल्याने पाटील कुटूंबियांनी शोक व्यक्त करत आपल्या घराजवळील शेतात त्याला दफन करून अखेरचा निरोप दिला.  यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, मी  माझ्या मुलापेक्षा  जास्त जीव टोनी या पाळीव कुत्र्यास  लावत होतो .आज आमच्याकुटुंबातील एक व्यक्तीच गेल्याचे दुःख आमच्या संपूर्ण कुटुंबाला आहे.



दरम्यान मानवी वस्तीत बिबट्या वारंवार शिरून पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनखात्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत