सात्रळ(वेबटीम) सात्रळ येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व ...
सात्रळ(वेबटीम)
सात्रळ येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिपक नरहरी घोलप यांना वनस्पतीशास्त्र विषयातील "स्टडीज ऑफ सम फ्रेश वॉटर अलगी एज ए लिक्विड बायो फर्टीलायझर ऑन लिफी व्हेजिटेबल" या शोधविषयाच्या संशोधन कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. पदवी जाहीर करण्यात आलेली आहे.
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, लोणी हे त्यांचे संशोधन केंद्र होते. त्यांना राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रो. (डॉ.) भाऊसाहेब औटी व विखे पाटील महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
उपप्राचार्य दिपक घोलप यांचे यापूर्वीही चार आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये उत्कृष्ट पेपर सादर केल्याबद्दल बेस्ट रिसर्च पेपर अवार्ड प्राप्त झालेला आहे. तसेच यूजीसी, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हरियाणा येथील भगत फुलसिंग महिला विश्वविद्यालय यांनी घेतलेल्या शिक्षक उदबोधन वर्गामधील उत्कृष्ट सहभागाबद्दल बेस्ट स्टुडंट पारितोषिकही प्राप्त झाले आहे. उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
त्यांच्या यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री. भारत घोगरे, संस्थेचे व महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत