पानेगांव (वेबटीम) शिरेगांवच्या विकासासाठी आणखी निधी देवून विकासाला नक्कीच गती मिळणार असा विश्वास शिरेगांव (ता.नेवासे) येथील हनुमान मंदिर सभ...
पानेगांव (वेबटीम)
शिरेगांवच्या विकासासाठी आणखी निधी देवून विकासाला नक्कीच गती मिळणार असा विश्वास शिरेगांव (ता.नेवासे) येथील हनुमान मंदिर सभागृहात अहमदनगर जिल्हा परिषदेतील माजी अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिलभाऊ गडाख हे ग्रामपंचायत नूतन कार्यालय तसेच विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात त्यांचा शुभहस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.अध्यस्थानी शिरेगांव संस्थेचे माजी अध्यक्ष भास्करराव तुवर हे होते.
माजी सभापती सुनील गडाख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सोनई जिल्हा परिषद गट सोडून मला जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी खरवंडी विकास करण्यासाठी पाठवलं होतं जे शक्य नव्हते परंतु ,जनतेचे तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख आशिर्वाद पाठिशी ते शक्य झालं
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने क्रांतीकारी निर्णय घेवून शेतकऱ्यांची होणारी बाजारातून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी घोडेगाव लोणी काष्टी नगर बाजारात सोनोग्राफी मशीन उपलब्ध केल्या जेणेकरून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबेल त्याचा बरोबर इतर योजना हि अमलात आणून त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना होतं आसल्याचा निश्चितच अभिमान असल्याचं गडाख यांनी सांगितले.
नेवासे तालुक्यातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन,कापूस आदी पिकांचे नुकसान झाले असून त्यातच कांदा भावाची झालेली परिस्थिती त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून याबाबत आमदार शंकरराव गडाख यांनी संबंधित विभागाला पंचनामे आदेश देण्यात आले असून तालुक्यात पंचनामे सुरू करण्यात आले आहे.
मुळाथडी परीसरातील मोठ्या संख्येने जेष्ठ तसेच युवकांची उपस्थित असल्याने युवा कार्यकर्त्यांना जूनी पिढीला विसरु नका त्यांना मान सन्मान द्या. असा मोलीक सल्ला या वेळी गडाख यांनी देवून आणखी विकास आपल्याला करायचा असून कुठलेच काम शिल्लक राहणार नसल्याची ग्वाही यावेळी गडाख यांनी दिली. तसेच लवकरच ग्रामपंचायत कार्यालय समोर भव्य सभामंडप काम सुरु होईल. जेणेकरून शिरेगांव भाविक भक्तांच गांव म्हणून ओळख आहे तसेच लग्ना कार्यासाठी निश्चितच या सभामंडपाचा उपयोग होईल या ग्रामस्थांनी टाळ्यांचा गजरात स्वागत केले.
यावेळी जेष्ठ नेते कुशाराम जाधव,मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,पानेगांवचे सरपंच संजय जंगले, डॉ.आप्पासाहेब होन, सुभाष तुवर आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी वंजारवाडीचे सरपंच महादेव दराडे, श्रीधर कृष्णाजी जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष काकासाहेब जाधव शिरेगांवच्या सरपंच सौ.भारती पवार,उपसरपंच सौ.पार्वती जाधव, सौ.मोहिनी तुवर, खंडेराव जाधव, बाळासाहेब जाधव, निरंजन होन जालिंदर बोर्डे,सौ.कलाबाई बर्डे सौ.अर्चना तुवर,सौ अलका बोर्डे,खेडलेपरमानंदचे उपसरपंच जावेद इनामदार मुळाचे संचालक रंगनाथ जंगले,हौशाबापू जंगले किशोर जंगले, भिकाजी जगताप,संत ज्ञानेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास जाधव, विनायक माकोणे, इंजिनिअर घुले, कनिष्ठ अभियंता गणेश सवई, पाणीपुरवठा दहातोंडे, सोनवणे,तलाठी भाऊसाहेब नवाळे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब कांबळे,ताहिर इनामदार, सिताराम औटी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.प्रस्ताविक सुभाष तुवर यांनी सुत्रसंचालन- मल्हारी होन यांनी केले.आभार - भाऊराव तुवर यांनी मानले
तालुक्यात नुसता खरवंडी जिल्हा परिषद गटात विकास न करता तालुक्यात हि विकासाचे नवं माॅडेल सुनिलभाऊंनी उभं केलं ज्यावेळी आम्ही गावाच्या विकासासाठी काम घेवून जातो कधीच शब्द भाऊंनी पडू दिला नाही.एवढा विकास कधीच पाहिला नाही. शिरेगांव सारख्या छोट्या गावाला दोन कोटी पेक्षा जास्त निधी सुनिल गडाख यांनी देवून जनतेच्या कामा बरोबरच वयक्तिक लाभाचे काम मार्गी लावले. परीसर नेहमीच पाठीशी राहिल अशी ग्वाही- जेष्ठ नेते कुशाराम जाधव


कोणत्याही टिप्पण्या नाहीत