मंत्रिपद गेल्याच दुःख नाही हो.... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मंत्रिपद गेल्याच दुःख नाही हो....

  राहुरी(श्रीकांत जाधव) म्हाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या अनेक कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्यामुळे राज्याचे माजी राज्यमंत...

 राहुरी(श्रीकांत जाधव)

म्हाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या अनेक कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्यामुळे राज्याचे माजी राज्यमंत्री तथा राहुरीचे लोकप्रतिनिधी आ.प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले आहेत.  विविध कार्यक्रमांत, पत्रकार परिषदेद्वारे आ. प्राजक्त तनपुरे सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. आता तर  आ.तनपुरे यांनी मंजूर कामांच्या स्थगिती विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २० व २१ ऑक्टोबर रोजी सायकल रॅली काढून सरकारचा निषेध करणार आहे.आ.तनपुरे यांच्या आंदोलनास शेतकरी, नागरिकांचा पाठींबा मिळत असून गावागावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.




  महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. यावेळी मतदारसंघातील अनेक विकास कामे मंजूर करून घेऊन ते मार्गी लावले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास खात्याअंतर्गत जवळपास ७ कोटींची कामे मंजूर झाली. मात्र त्यानंतर म्हाविकास आघाडी सत्तेतून पाय उतार होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारने म्हाविकास आघाडीच्या काळातील अनेक मंजूर कामांना स्थगिती दिली. आपसूक रस्ते व इतर कामांना पुर्णपणे ब्रेक मिळाला. राहुरी मतदारसंघातील ७ कोटीच्या विकास कामांना स्थगिती मिळाल्याने आ.प्राजक्त तनपुरे यांनी नाराजी व्यक्त केली.अनेक कार्यक्रमात त्यांनी सरकारच्या या धोरणावर कडाडून टीका केली. एवढ्यावर न थांबता आ.तनपुरे यांनी आता आंदोलन हाती घेतले आहे. रस्त्याच्या मंजूर कामाना सरकारने स्थगिती दिल्याने आ.तनपुरे व कार्यकर्ते सायकल रॅली काढून सरकारचा निषेध करणार आहे. ब्राम्हणी, बारागाव नांदूर, मल्हारवाडी, घोरपडवाडीसह अनेक गावांत ही सायकल रॅली पोहचणार आहे. या आंदोलनास गावातील नागरिकांचा पाठींबा मिळत आहे.



ब्राम्हणी येथे डॉ तनपुरे सहकारी कारखान्याचे संचालक भारत तारडे ,बाळासाहेब खुळे ,नवनाथ थोरात, राहुल म्हसे, उत्तमराव पवार काकासाहेब शिरसाठ ,बाळासाहेब आघाव, इंद्रभान पेरणे, आयुबभाई पठाण, बाळासाहेब देशमुख ,सुरेश म्हसे ,रावसाहेब तमनर, विजय तमनर, प्रवीण शिरसाठ, ऋषिकेश म्हसे, माणिक तारडे, बाळासाहेब शेळके,काका राजदेव आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थित बैठक पार पडून  आंदोलनाची दिशा व नियोजन करण्यात आले.


 एकंदरीत कामांना स्थगिती मिळाल्याने आ.तनपुरे यांच्यासह कार्यकर्त्यांतून संतप्त प्रतिक्रिया येत असून याप्रश्नी सायकल रॅली द्वारे निषेध होत असला तरी आणखी तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.



*मंत्रिपद गेल्याच दुःख नाही हो....*


गेल्या अडीच वर्षाच्या काळात मंत्रीपदावर काम करत असताना दिवस-रात्र एकूण करून मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे काम केले. दरम्यानच्या काळात सरकार बदलले व अनेक कामांना नव्याने आलेल्या सरकारने स्थगिती दिली.मला मंत्रिपद गेल्याचे दुःख नाही मात्र  मतदारसंघात ग्रामविकास खात्याअंतर्गत मंजूर झालेल्या जवळपास १० कोटी रुपयांच्या कामांना सरकारने स्थगिती दिल्याचे दुःख वाटते. गावातील-वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांच्या कामाला कसलाही विचार न करता शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली.एकीकडे बुलेट ट्रेन व इतर गोष्टीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे आणि दुसरीकडे नागरिकांच्या मुलुभूत समस्या सोडविण्यासाठी मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देत आहेत. या सरकारला लोकांची प्राथमिकता कळते का? असा सवालही आ.तनपुरे यांनी उपस्थित केला आहे.


बुलेट ट्रेन नको हो...दूध डेअरीवर शेतकरी व  दवाखान्यात पेशंट न्यायला नीट रस्ते नाही त्याच बघा...

भाजप सरकारने ग्रामीण भागातील जनतेच्या भावना समजून घ्याव्यात. आम्हाला 6000 कोटी रुपये खर्च करून चालणारी बुलेट ट्रेन नको आहे. आम्हाला आमच्या घरी, शेतात वाडया वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ते हवे आहेत. नवीन शासनाने ग्रामीण भागातील रस्त्यांना स्थगिती देऊन बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आम्हाला दुचाकीवर गावातल्या दूध डेअरीवर जायला देखिल नीट रस्ते नाहीत. आमचं पेशंट दवाखान्यात न्यायला रस्त्याअभावी अडचणी होतात असे आ. तनपुरे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत