तुळशीच्या लग्नानंतर धुमधडाक्यात वाजणार सनई-चौघडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तुळशीच्या लग्नानंतर धुमधडाक्यात वाजणार सनई-चौघडे

मुंबई(वेबटीम) कार्तिक पौर्णिमेला समृद्धी संपन्नतेचा सोहळा असलेल्या दीपावलीचा समारोप होणार आहे. ५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून याच ...

मुंबई(वेबटीम)

कार्तिक पौर्णिमेला समृद्धी संपन्नतेचा सोहळा असलेल्या दीपावलीचा समारोप होणार आहे. ५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून याच दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत अर्थात ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे. ५ नोव्हेंबरलाच चातुर्मास समाप्ती, शनिप्रदोष व शाकद्रत समाप्ती असल्याने या दिवसापासून विवाहसोहळे मौजीबंधनाचे सनई-चौघडे वाजण्यास प्रारंभ होणार आहे.





भारतीय पंचांगानुसार आणि तत्कालीन पर्यावरणीय वर्तनानुसार पावसाळा आटोपल्यानंतर सोयीनुसार म्हणून वैवाहिक सोहळे साजरे करण्यात येत असतात. त्यानुसार वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून (देवशयनी) ते कार्तिक शुल्क एकादशीपर्यंत (देवउठनी) चातुर्मास पाळला जातो. या काळात भगवान विष्णू निद्राधीन असतात, असा समज आहे. विष्णू आणि लक्ष्मी या विवाहाच्या देवता असल्याने या काळात वैवाहिक सोहळे, मौजीबंधन साजरे करू नये, अशी भावना प्राचीन भारतात रुजली.


यंदा देवउठनी एकादशी ४ नोव्हेंबरला येत असून द्वादशीला भगवान विष्णूचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो आणि तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे.





५८ विवाह मुहूर्त

चातुर्मास समाप्ती ते चातुर्मास प्रारंभापर्यंत अर्थात २५ नोव्हेंबर २०२२ ते २८ जून २०२३ या काळात शास्त्रानुसार एकूण ५८ विवाह मुहूर्त येत आहेत. एप्रिल २०२३ मध्ये गुरुचा अस्त असल्यामुळे, फक्त रविवार ३० एप्रिल रोजी विवाह मुहूर्त आहे. २०२३ मध्ये २९ जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे.


महिनानिहाय विवाह मुहूर्ताच्या तारखा (२०२२ ते २०२३)

नोव्हेंबर २५, २६, २८, २९

डिसेंबर २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८१९

जानेवारी १८, २६, २७, ३१

फेब्रुवारी : ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८

मार्च : ९, १३, १७, १८

एप्रिल : ३०

मे २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०

जून १, ४, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत