वरवंडी व १० गावे पाणीयोजनेसाठी रु. ४३ कोटी ६६ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वरवंडी व १० गावे पाणीयोजनेसाठी रु. ४३ कोटी ६६ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

  राहुरी(वेबटीम) राहुरी मतदार संघातील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत वरवंडी व इतर १० गावांकरीता  पाणीपुरवठा योजना साठी ४३ कोटी ६६ लाख रुपयांच...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी मतदार संघातील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत वरवंडी व इतर १० गावांकरीता  पाणीपुरवठा योजना साठी ४३ कोटी ६६ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.


 या योजनेला ७ आक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण नाशिक समितीने तांत्रिक मान्यता दिली होती. वरवंडी सह तालुक्यातील बाभुळगांव ,धामोरी खुर्द , धामोरी बुद्रुक , खडांबे बुद्रुक तसेच नगर तालुक्यातील नांदगांव ,शिंगवे, देहेरे, विळद आदि वरदान ठरणा-या या पाणी योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने तालुक्यातील वरवंडी,बाभुळगांव, धामोरी खु,धामोरी बु ,खडांबे बु. गावांचा  पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असुन या गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रीया होवुन काम सुरु होईल असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.  

वरवंडी सह १० गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना वेळोवेळी पाठपुरावा करत मंत्रालय स्तरावर बैठका घेवुन हा प्रश्न मार्गी लागला आहे.  आता पर्यंत मतदारसंघात आपल्या पाठपुराव्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी मिळालेला असुन प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांची लवकरच निविदा प्रक्रिया होवुन पुढील प्रत्यक्ष कामांना लवकरच सुरवात होईल. या नवीन पाणीयोजनेमुळे वरवंडी,बाभुळगांव, धामोरी खु,धामोरी बु ,खडांबे बु. येथील ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानुन धन्यवाद दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत