प्रेरणा मल्टीस्टेटच्या ५६ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रेरणा मल्टीस्टेटच्या ५६ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी येथील प्रेरणा मल्टीस्टेटने ५६ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून राहुरी फॅक्टरी शाखेत १० कोटी २५ ला...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


राहुरी येथील प्रेरणा मल्टीस्टेटने ५६ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून राहुरी फॅक्टरी शाखेत १० कोटी २५ लाखांच्या ठेवी पूर्ण झाल्या आहेत. याबद्दल आज १७ नोव्हेंबर रोजी सकाळी राहुरी फॅक्टरी परिसरातील ठेवीदार, खातेदार व सभासदांनी प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक  अध्यक्ष सुरेश वाबळे यांचा सन्मान केला.


  प्रेरणा परिवाराचे सर्वेसर्वा सुरेश वाबळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली   राहुरी येथे सन २०१२ रोजी स्थापन झालेल्या प्रेरणा मल्टीस्टेटने ठेवीदार, ग्राहकांचा विश्वास संपादन करून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. राहुरी, श्रीरामपूर, राहुरी फॅक्टरी, सोनगाव सात्रळ, बेबड ओव्हळ (पुणे), कोल्हार, स्टेशन रोड राहुरी आदी ७ ठिकाणी शाखा विस्तार असलेल्या प्रेरणा मल्टीस्टेटमध्ये जवळपास ४५० रुपयांच्या उलाढाली झाल्या असून एनएफटी,आरटीजीएस, मोबाईल अँप,एसएममस,सोने तारण कर्ज ,दैनदिन बचत ठेव आदी सुविधा उपलब्ध आहे.


 प्रेरणा मल्टीस्टेटने ५६ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडला आहे. राहुरी फॅक्टरी शाखेच्या १० कोटी २५ लाख रुपयांच्या ठेवी पूर्ण झाल्या आहेत. याबद्दल प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांचा ठेवीदार व ग्राहकांनी सन्मान केला.




यावेळी प्रेरणा मल्टीस्टेटचे  व्हा.विष्णूपंत वरपे, प्रेरणा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मच्छींद्र हुरुळे, आबासाहेब वाळुंज, लक्ष्मण तांबे,रावसाहेब देठे, प्रा.लांबे,किशोर कोबरणे, अशोक चंद्रे,नंदूशेठ भराडीया, दिलीप शर्मा , शरद  वाळके, श्री.घाडगे आदिंसह संस्थेचे कर्मचारी अतुल कोळसे,संदीप जाधव ,भगीरथ शेलार ,सरिता बकाल ,सारिका शिंदे, भक्ती भंडारी आदी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत