सात्रळ (वेबटीम) मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने येथील "अक्षर मानव "वाचनालयाने एक अनोखा उपक्रम राबविला असून या उ...
सात्रळ (वेबटीम)
मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने येथील "अक्षर मानव "वाचनालयाने एक अनोखा उपक्रम राबविला असून या उपक्रमा अंतर्गत मुलांच्या सुट्टीच्या दिवशी मुलांना घरपोहच पुस्तकसेवा सुरु केली आहे.
या मध्ये गोष्टी, विज्ञान, थोरा मोठ्यांचे चरित्र, खेळ अश्या अनेक विषयांवरील पुस्तके मुलांना वाचनास मिळत आहेत. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाल्याने त्यांच्या ज्ञानात वाढ झाल्याचे चित्र आढळून येत असल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमासाठी "अक्षर मानव "वाचनालयाचे सदस्य होण्यासाठी एक व्हाट्स उप ग्रुप तयार केला असून दिलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज करून मुलांना या उपक्रमात सहभागी होता येते. या पूर्वीही "अक्षर मानव "ने लहान विधार्थी विद्यार्थिनी साठी चित्रकला मार्गदर्शन,भित्तीचित्र पेन्टिंग, सेल्फी पॉईंट, लेखक भेट, पक्षी निरक्षण, वृक्ष लागवड व संवर्धन असे अनेक उपक्रम राबविले असून लहानग्यांनी त्याचा आनंद उपभोगला आहे.
"अक्षर मानव "च्या विविध उपक्रमासाठी पंकजजदादा कडू , सचिन पवार, पत्रकार अनिल वाघचौरे, कडलग सर, झावरे सर, अविनाश कडू व त्यांचे सहकारी यांचे मोठे योगदान असून परिसरातील पालकांनी याबद्दल त्यांना धन्यवाद देत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत