श्रीरामपूर येथील ए जी चर्चचे धर्मगुरू सचीन चक्रनारायण यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर येथील ए जी चर्चचे धर्मगुरू सचीन चक्रनारायण यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी

श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर शहरातील ए जी चर्चेचे धर्मगुरू सचिन चक्रनारायण यांनी चर्चमध्ये प्रार्थना घेऊ नये म्हणून चौघा जणांनी शिवीगाळ, धक...

श्रीरामपूर(वेबटीम)



श्रीरामपूर शहरातील ए जी चर्चेचे धर्मगुरू सचिन चक्रनारायण यांनी चर्चमध्ये प्रार्थना घेऊ नये म्हणून चौघा जणांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्याची नोंद करण्यात आली आहे.

 याबाबत शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत धर्मगुरू सचिन रमेश चक्रनारायण यांनी म्हंटले की, दिनांक १० फेब्रुवारी रोजी शहरातील रेल्वे लाईन या ठिकाणी विजय मार्टीन केदारी(रा.कणगर, ता.राहुरी), अभिजित विजय केदारी(रा.कणगर, ता.राहुरी), विश्वरंजन चंद्रसेन मकासरे ,  सुयश विश्वरंजन मकासरे(दोघे रा.संगमनेर रोड, श्रीरामपूर) यांनी मला चर्च मध्ये प्रार्थना घेऊ नये म्हणून  शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.


याप्रकरणी धर्मगुरू चक्रनारायण यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात   विजय मार्टीन केदारी(रा.कणगर, ता.राहुरी), अभिजित विजय केदारी(रा.कणगर, ता.राहुरी), विश्वरंजन चंद्रसेन मकासरे ,  सुयश विश्वरंजन मकासरे(दोघे रा.संगमनेर रोड, श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


दरम्यान श्रीरामपूर येथील ए जी चर्च बेकायदेशीर हस्तक्षेप व धर्मगुरू चक्रनारायण यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात गेल्या महिन्यात आरपीआय आंबेडकर पक्षाच्या वतीने श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.त्यातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत