देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवाची आज मंगळवार दि.२१ मार्च रोजी सांगता असून रात्री ८ वाजत...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवाची आज मंगळवार दि.२१ मार्च रोजी सांगता असून रात्री ८ वाजता देवळाली प्रवरा बाजारतळावर पुणे व मुंबई येथील 'तुमच्यासाठी काहीपण' आणि' जीव रंगला' या दोन सुपरहिट कलाकारांचा दुरंगी लावणी सामना रंगणार आहे.
गेले दोन दिवस कीर्तन, पालखी मिरवणुक, कुस्त्यांचा जंगी हंगामा, फटाक्यांची आतिषबाजी आदी कार्यक्रम संपन्न झाले.दोन दिवस पार पडलेल्या यात्रा उत्सवात नागरिकांनी रहाट पाळण्यात बसण्यासाठी व खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
आज लावण्यांचा दुरंगी सामना देवळाली बाजार तळावर आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी रसिकांनी मोठ्या उपस्थित रहावे असे आवाहन श्री.समर्थ बाबुराव महाराज यात्रा कमिटीने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत