राहुरी(प्रतिनिधी) राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सूत्रे नगरला देणार का असा सवाल माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला त्यावर...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सूत्रे नगरला देणार का असा सवाल माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला त्यावर उपस्थित मतदारांनी स्पष्ट नकार देत प्रतिसाद दिला.
राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे राहुरी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर जाधव होते माजी खासदार प्रसाद तनपुरे शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे माजी संचालक साहेबराव दुशिंग नवनाथ ढोकणे के एम पानसरे सुभाष करपे जि प सदस्य धनंजय गाडे विलास शिरसाट प्रभाकर गाडे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे भाऊसाहेब नवले उपस्थित होते
आमदार तनपुरे म्हणाले की, विद्यमान सभापती अरुण तनपुरे यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे राज्यात बाजार समितीचा नावलौकिक केला नगरच्या बाजार समितीची काय परिस्थिती आहे हे सर्वांनी पाहिले अशा लोकांच्या ताब्यात सूत्रे देणार का डॉ तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या ताब्यात सत्ता होती की अन्यत्र होती हे सर्वांनी जवळून पाहिले आहे तशाच पद्धतीची परिस्थिती राहुरी बाजार समितीची करायची का असा सवाल केला आपली अवस्था तशी करू नका बाजार समिती आर्थिक दृष्ट्या सक्षम केली विरोधकही खाजगीत बाजार समितीची सत्ता अरुण तनपुरे यांच्या ताब्यातच असावी अशा मताची आहेत केवळ राहुरीच नव्हे तर राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील सर्वच बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात घेण्यासाठी सर्व ती ताकद पणाला लावून झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त केला निवडणूक ही गांभीर्यांनीच घेतली जात असून कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विरोधकांच्या खोट्या भुलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले राज्यातील सरकार लवकरच कोसळेल त्यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या वेळी झालेल्या राजकारणाचा निश्चितपणे विचार करू मी मंत्री असताना सुडाचे राजकारण केले नाही तसे करायचे ठरवले असते तर नगर बाजार समितीचे संचालक मंडळ जेलमध्ये गेले असते त्या संचालकांना कोणताही अधिकार नव्हता कर्ते धर्ते दुसरेच होते त्यामुळे तसा उद्योग आम्ही केला नाही बाजार समितीचा लौकिक वाढवायचा असेल तर महाविकास आघाडीच्या ताब्यातच सत्ता सूत्रे देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभापती अरुण तनपुरे म्हणाले की गेल्या अठरा वर्षापासून समितीची सूत्रे ताब्यात घेतल्यापासून संस्थेचा व शेतकऱ्यांचा नेहमीच विचार केला अधिक विस्तार करून सर्व सुविधा कशा उपलब्ध होतील यावर भर दिला उत्पन्नाचे मार्ग शोधून संस्थेने स्वबळावर कोणतेही कर्ज न घेता आवारातील रस्ते व्यापारी संकुल आडते व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या सुमारे 15 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा आहेत 13 एकर नवीन जागा खरेदी करून तेथे फळांचा जनावरांचा व मोकळ्या कांद्याचा लिलाव केला जाणार आहे पेट्रोल पंपाची ही उभारणी केली उपबाजार असलेल्या वांबोरीतही योजना राबविल्या हे सर्व करत असताना कोणत्याही वित्तीय संस्थेकडे हात पसरले नाहीत स्वबळावरच सर्व काही उभे केले याउलट नगरच्या बाजार समितीची अवस्था काय आहे असा सवाल करत विरोधकांनी केलेल्या आरोपांचा पुराव्यानिशी समाचार घेतला 15 कोटी रुपयांच्या ठेवीच्या पावत्याच्या प्रति त्यांनी सभेत दाखविल्या व प्रत्येक आरोप खोडून काढले सन 2004 व आजची परिस्थिती यात मोठा फरक आहे विकत घेतलेल्या 13 एकर जागेवर आराखडा तयार करण्यात आला असून सर्व सोपस्कार पूर्ण होताच मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरवून दाखवू असे श्री तनपुरे यांनी नमूद केले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे प्रकाश देठे माजी संचालक सुनील अडसुरे आबासाहेब वाघमारे यांची भाषणे झाली या मेळाव्यास राहुरी तालुक्यातील विविध गावातील मतदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव यांनी आभार मानले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत